अर्ध्यावरती डाव मोडला..., मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या आठवणीने पवनीवासीय शोकमग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:25 AM2017-12-25T03:25:30+5:302017-12-25T03:30:17+5:30

पुढे इंजिनिअर होऊन तो सैन्यात रूजू झाला. आज त्याच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता, त्याला भेटण्यासाठी आम्ही जात होतो, पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाच्या आठवणी सांगताना वीरमातेने हंबरडा फोडला तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

Half-way break ..., remembrance of Major Prafulla Moharkar | अर्ध्यावरती डाव मोडला..., मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या आठवणीने पवनीवासीय शोकमग्न

अर्ध्यावरती डाव मोडला..., मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या आठवणीने पवनीवासीय शोकमग्न

googlenewsNext

नंदू परसावार / अशोक पारधी
पवनी (भंडारा) : काश्मीर येथे झालेल्या चकमकीत भंडारा जिल्ह्याचा सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर हे शहीद झाले, त्यांचे पार्थिव ११ वाजता त्यांच्या गावात आणण्यात आले. एक वाजता त्यांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार नाना पटोले, आम.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. पवनी नगरपालिकेने वैनगंगा नदी घाट परिसरात तशी व्यवस्था केली होती.

काश्मिरच्या राजोरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल अंबादास मोहरकर (३२) हे शहीद झाले. ही वार्ता रात्री पवनी तालुक्यात पसरताच त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी एकच गर्दी केली. घरी आईवडील नसतानादेखील शोकमय पवनीवासीय त्यांच्या घरासमोर एकत्रित होऊन आठवणींना उजाळा देत होते.

लहानपणापासूनच त्याला वाचनाची आवड होती. वडील नागपुरला गेले की खाऊऐवजी पुस्तके आणा, असे तो आग्रहाने सांगायचा. नागपूरच्या सोमलवार शाळेत शिकताना प्रहारच्या उन्हाळी शिबिरात तो भाग घ्यायचा. तेव्हापासूनच सैन्यात जाण्याची आवड त्याच्यात निर्माण झाली. पुढे इंजिनिअर होऊन तो सैन्यात रूजू झाला. आज त्याच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता, त्याला भेटण्यासाठी आम्ही जात होतो, पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाच्या आठवणी सांगताना वीरमातेने हंबरडा फोडला तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

मोहरकर परिवार मूळचे पवनी तालुक्यातील जुनोना येथील रहिवाशी असून अंबादास मोहरकर हे वलनी येथील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक होते. सेवानिवृत्तीनंतर पवनीत भाईतलाव वॉर्डात घर बांधून ते स्थायिक झाले. मेजर प्रफुल यांची आई सुधाताई या शिक्षीका असून मोठा मुलगा मेजर तर लहान मुलगा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याला भेटण्यासाठी शनिवारी ते नागपूरहून पुण्याकडे निघाले होते. त्याचदरम्यान, मोठा मुलगा प्रफुल शहीद झाल्याची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून रात्री उशिरा ते पवनीला पोहोचले. प्रफुल्ल यांचे आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सोमलवार हायस्कुलमध्ये झाले. डेहराडून, खडकवासला पुणे येथे शिक्षण पूर्ण करून राहुरी येथे लेफ्टनंट या पदावर ते रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीने अल्पावधीतच ते मेजर पदावर पोहचले.


मुलगा शहीद झाल्याचे दु:ख आहे, परंतु देशाची सेवा करताना शहीद झाल्याचा अभिमान वाटतो. देशाच्या सीमेवर संरक्षण करण्यासाठी कार्य करणा-या सैनिकांच्या संरक्षणासाठी शासनाने सतर्कता बाळगली पाहिजे. पाकिस्तानी लष्कराला शासनाने धडा शिकवावा.
- सुधाताई मोहरकर, (प्रफुल्ल यांची आई)

प्रफुल्ल सोज्वळ व सुसंस्कृत होते. जावई असले तरी ते आम्हाला मुलाप्रमाणे होते. माझा मुलगा अभिषेक व प्रफुल्ल हे दोघेही एकाचवेळी सैन्यात अधिकारी म्हणून रूजू झाले. प्रफुल्ल हे व्हॉलिबॉल, फुटबॉल व हॉकीचा उत्तम खेळाडू होते.
- विजय शिंदे, पुणे. (प्रफुल्ल यांचे सासरे)

Web Title: Half-way break ..., remembrance of Major Prafulla Moharkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.