अर्धेअधिक कामगार नोंदणीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:15 PM2018-10-25T22:15:56+5:302018-10-25T22:17:23+5:30
असंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी अभियान सुरु असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कामगार या नोंदणीपासून वंचित असल्याचे पुढे आले आहे. सुमारे १३ हजार कामगारांपैकी केवळ ५ हजार ६०० कामगारांची नोंद करण्यात आली.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : असंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी अभियान सुरु असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कामगार या नोंदणीपासून वंचित असल्याचे पुढे आले आहे. सुमारे १३ हजार कामगारांपैकी केवळ ५ हजार ६०० कामगारांची नोंद करण्यात आली. आणखी १० ते १२ हजार अर्ज प्रलंबित असून विविध लाभापासून कामगार वंचित आहेत.
भंडारा-गोंदिया जिल्हा असंघटित बांधकाम कामगारांचे २०१२ ते २०१८ या कालावधीत सुमारे १३ हजार अर्ज सादर केले होते. त्यापैकी केवळ ५ हजार ६०० कामगारांची नोंदणी कामगार आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी करण्यात आली आहे. शेकडो अर्ज आजही प्रलंबित आहे. केवळ रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करणाऱ्यांची नोंदणी मार्गी लावली जात आहे. दरवर्षी ही संख्या वाढत असून सध्या दहा ते बारा हजार असंघटित बांधकाम कामगारांचे अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य शासनाने कामगारांच्या हितासाठी अनेक योजना आणल्या आहेत. नोंदणीकृत असंघटित बांधकाम कामगारांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आदी १९ प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा त्यात समावेश आहे. परंतु संबंधीत विभागाच्या कासवगतीने शेकडो कामगार या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे असंघटित कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत कोणीही दखल घेतली नाही.
सदर योजनेसाठी राज्यशासन नियमित मोठा निधी देते. परंतु संघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी रखडल्याने निधी तसाच पडून असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळे तथा घरेलु कामगार असंघटित संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुंभारे यांनी केला आहे. तुमसर येथे शुक्रवारी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात विविध प्रकारच्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत कामगारांची नोंदणी होणार आहे. त्यात असंघटीत क्षेत्रात काम करणाºया कामगारांनी आपली नावे नोंदवावे असे आवाहन कांबळे व कुंभारे यांनी केले आहे. यासंदर्भात सहायक कामगार आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.