पाच रुपयात मूठभर कोथिंबीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:28+5:302021-01-03T04:35:28+5:30
पालांदूर परिसरात चुलबंद खोऱ्यात सुमारे १६६ हेक्टर क्षेत्रावर बागायतीची लागवड केलेली आहे. यात कोथिंबीरला अधिक पसंती देण्यात आलेली ...
पालांदूर परिसरात चुलबंद खोऱ्यात सुमारे १६६ हेक्टर क्षेत्रावर बागायतीची लागवड केलेली आहे. यात कोथिंबीरला अधिक पसंती देण्यात आलेली आहे. सुमारे ५० ते ६० दिवसांत कोथिंबीर विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने कमी दिवसांत अधिक पैसा कमवण्याच्या हेतूने शेतकरीवर्ग दरवर्षी डिसेंबर महिन्यात कोथिंबिरीची शेती करतो. मकर संक्रांतपर्यंत दरवर्षी कोथंबीरला बरा भाव असतो. सुमारे १५ ते २० रुपये या दराने शेतकरी समाधानी असतो, परंतु आठ ते दहा दिवसांपासून कोथिंबीरला केवळ दहा रुपये पर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आशा निराशेत बदललेली आहे. कोथिंबीर बियाणा साध्या वानात दोनशे तीनशे रुपये किलो, तर संकरितमध्ये साडेतीनशे ते चारशे रुपये किलोचा दर आहे. बियाणाचा विचार करता दहा रुपये किलोचा कोथिंबीर ला भाव अजिबात नाही.
भाजीपाल्याची आवक आहे. पवनी तालुक्यातील भावड येथून खूप मोठ्या प्रमाणात कोथिंबीर पालांदूर आठवडी बाजारात दाखल झाली. त्यामुळे ही आणखी मागणी घटून भाव एकदमच पडले. आणलेली कोथिंबीर विकू न शकल्याने शेवटी त्याला परत न्यावे लागले.
असेच मेथी, पालक, मुळा यांचे भाव दहा रुपयापर्यंत असल्याने भाजीपाल्याचे बागायतदार संकटात आले आहेत.