यंत्राने हिरावली मजुरांच्या हातची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:00 AM2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:21+5:30

कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे.

The handiwork of the workers deprived of the machine | यंत्राने हिरावली मजुरांच्या हातची कामे

यंत्राने हिरावली मजुरांच्या हातची कामे

Next
ठळक मुद्देशेती व्यवसाय संकटात : केवळ पेरणी व कोळपणीसाठी बैलांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाच-सहा वर्षांपासून सालगगड्यांचे पगार वाढल्याने व शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नाही. त्यामुळे बळीराजाने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही. ‘हायटेक’ शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले तरी इतर अनेक समस्यांमुळे शेतकरी मुटाकुटीला आला आहे.
कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे. तसेच शेती कसण्यासाठी लागणाºया बैलजोडीचे दर वाढलेले आहेत. तसेच मजुरीने न उरकणारी कामे, दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. तर काही शेतकरी बैलजोडी असूनही मोजकी कामे बैलाद्वारे उरकून उर्वरित कामासाठी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. बळीराजा शेतातील कामांबरोबर शेणखत घालणे आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करताना दिसून येत आहेत. तसेच खरीप व रबी हंगामातही पेरणीसाठी ट्रॅक्टरचा प्रयोग करताना दिसून येत आहे. केवळ पेरणी व कोळपणीसाठी बैलांचा वापर केला जात आहे.
परंतु यंदा गारपिटीमुळे चाºयाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाल्याने पशुधन कसे जोपासावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. धान्याच्या राशीसाठी ट्रॅक्टरवरील मळणीयंत्रे, किटक नाशकाची फवारणी ही ट्रॅक्टरवर पाण्याची टाकी ठेवून केली जात आहे. बैलगाडीच्या सहाय्याने मजूर लावून अथवा सालगडी ठेवून शेताची मशागत करताना येणारा खर्च व ट्रॅक्टरच्या सहाय्याने येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ घातल्यास ट्रॅक्टरचा वापर परवडणारा आहे. परिणामी ट्रॅक्टरवाल्यांना रोजगार मिळत असला तरी इतर मजुरांचे हात रिकामेच आहे.
सध्या शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केल्याने मशागतीचे कााम चांगले होते. तेच काम बैलाच्या सहाय्याने केल्यास कामास उशिर लागतो. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केलेली शेती महत्वाची असली तरी त्यामुळे रोजगार कमी झाल्याने बेरोजगारांचे हात वाढले आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेतीची चांगली मशागत होते. त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. परंतु ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने केलेल्या कामाचे पैसे त्यांच्या सोयीने घ्यावे लागतात.

Web Title: The handiwork of the workers deprived of the machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती