पॉलिथीनमुक्त शहरासाठी सरसावणार ‘हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 12:31 AM2016-03-13T00:31:20+5:302016-03-13T00:31:20+5:30

शहरातील प्रत्येक दुकानात खरेदीदाराला विक्रेत्यांकडून साहित्यासाठी पॉलिथीन दिली जाते. त्याचा वापर झाल्यानंतर त्या इतरत्र फेकण्यात येतात.

'Hands' for a polythene free city | पॉलिथीनमुक्त शहरासाठी सरसावणार ‘हात’

पॉलिथीनमुक्त शहरासाठी सरसावणार ‘हात’

Next

ग्रीन हेरिटेज संस्थेचा पुढाकार : जिल्हाधिकारी व पालिका प्रशासनाला दिले निवेदन
भंडारा : शहरातील प्रत्येक दुकानात खरेदीदाराला विक्रेत्यांकडून साहित्यासाठी पॉलिथीन दिली जाते. त्याचा वापर झाल्यानंतर त्या इतरत्र फेकण्यात येतात. त्यामुळे प्रदूषण तथा पर्यावरणाला धोका पोहचत आहे. यासाठी शहर पॉलिथीनमुक्त करण्यासाठी ग्रीन हेरिटेज संस्थेने पुढाकार घेतला असून जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.
पॉलिथीन वापराच्या अतिरेकामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. टूथपेस्ट, मिनरल वॉटरच्या बॉटल्स, शॉम्पू, गुटखा, तंबाखू व अन्य पदार्थांसाठी पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. वापरानंतर त्या शहरात इतरत्र बेवारस फेकण्यात येतात. त्यामुळे अनेकदा नाल्यांमध्ये त्या तुंबलेल्या असतात. त्यामुळे नाल्यांमधील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होत असल्याने पर्यायाने तिथे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य तथा पर्यावरणाला धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रीन हेरिटेज संस्थेने शहराला पॉलीथीनमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष सईद शेख, चंदा मुरकुटे, डॉ.यशवंती गायधने, विलास केजरकर, संध्या किरोलीकर, इंद्रायणी वासनिक, शैलेंद्र श्रीवास्तव, नितीन कुथे, नगरसेवक महेंद्र निंबार्ते, शमीम शेख, भाजीपाला फेडरेशनचे सुधीर धकाते आदींनी नगराध्यक्ष बाबू बागडे व मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व शहराला पॉलिथीनमुक्त करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. दरम्यान यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. शहर पॉलिथीनमुक्त होण्यासाठी नागरिकांच्याही सहकार्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

१ एप्रिलपासून शहरात पॉलिथीन बंदी
पर्यावरण व मनुष्याच्या आरोग्याला पोहचत असलेल्या प्लास्टिक वापराच्या धोक्यातून शहराला मुक्त करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट व शहर स्वच्छतेकरिता व्यापारी, दुकानदार व भाजीपाला विक्रेता यांची सभा घेण्यात आली. यावेळी १ एप्रिलपासून भंडारा शहरात पॉलिथीन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: 'Hands' for a polythene free city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.