एटीएममधून निघाल्या हस्तलिखित नोटा

By admin | Published: February 2, 2017 12:20 AM2017-02-02T00:20:05+5:302017-02-02T00:20:05+5:30

नोटबंदीनंतर चलनात दोन हजारांची नोट व्यवहारात आली. ती गरिबांना व गावकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे.

Handwritten notes originating from ATMs | एटीएममधून निघाल्या हस्तलिखित नोटा

एटीएममधून निघाल्या हस्तलिखित नोटा

Next

बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधील प्रकार : बँकेचा नोटा बदलण्यास नकार
पालांदूर : नोटबंदीनंतर चलनात दोन हजारांची नोट व्यवहारात आली. ती गरिबांना व गावकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे. व्यवहारात सुटे मिळत नाही तर नवीनच भानगड पुढे आली असून एटीएममधून २ हजारांच्या नोटांवर हस्तलिखाण असलेल्या नोटा मिळाल्या. नोटा बदलून देण्यास बँकेने टाळाटाळ केल्याने ग्राहकाला फटका बसला आहे.
पालांदूर शेतशिवारात मऱ्हेगाव येथील देवेंद्र द्रुगकर यांनी बँक आॅफ इंडियाच्या ९२२८१८११८८८६०५६ या खात्यातून १० हजारांचा विड्राल एटीएमद्वारे घेतला. यात २ हजाराच्या पाच नोटात दोन नोटांवर हस्तलिखितच्या खुणा आढळल्या. देवेंद्र द्रुगकर यांनी सदर नोटा एटीएमच्या रखवालदाराला वेळीच दाखविल्या. लगेच लगतच्या शाखेत ही जाऊन नोटा दाखविल्या पंरतु बँक अधिकाऱ्यांनी नोटा बदलून देण्यास नकार देत. ही आमची जबाबदारी नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे त्या दोन नोटा म्हणजे चार हजारांचा भुर्दंड देवेंद्रला बसला आहे. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली. (वार्ताहर)

Web Title: Handwritten notes originating from ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.