तुमसरातील हनुमान तलाव ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:01 PM2018-07-17T22:01:13+5:302018-07-17T22:01:44+5:30

मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. शहरातील विनोबा भावे नगर जलमय झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. जवळील हनुमान तलाव तुडूंब भरला असून तलाव फूटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. तलावाशेजारीच नागरिकांची येथे घरे आहेत.

Hanuman Lake 'Overflow' | तुमसरातील हनुमान तलाव ‘ओव्हरफ्लो’

तुमसरातील हनुमान तलाव ‘ओव्हरफ्लो’

Next
ठळक मुद्देधोक्याची शक्यता : विनोबानगर जलमय, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. शहरातील विनोबा भावे नगर जलमय झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. जवळील हनुमान तलाव तुडूंब भरला असून तलाव फूटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. तलावाशेजारीच नागरिकांची येथे घरे आहेत.
सतत पाऊस बरसल्याने पाणी साठ्यात वाढ झाली आहे. शहरातील विनोबा भावेनगर, श्रीरामनगर, गोवर्धन नगर, इंदिरानगर सखल भागात शेकडो घरात पाणी शिरले आहे. परिसरातील हनुमान तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
पाणी जाण्यास पर्याय नसल्याने तलाव फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिसरात रिकामे भुखंडावर पाणी साचल्याने तलावसदृश्य स्थिती येथे दिसत आहे.
तलावातील पाणी ओव्हरफ्लो होवून अरूंद नालीतून ते पाणी वाहत आहे. शहरातील सांडपाणी याच नालीतून जाते. घरात शिरलेल्या नागरिकांची स्थिती बिकट झाली आहे. पाणी वाहून जाण्याकरिता येथे पर्यायी मार्ग नाही. घराबाहेर कसे पडावे असा प्रश्न नागरिकाना पडला आहे. घरासमोर तलाव निर्माण झाले आहे. येथे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने येथे दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. पुन्हा पाऊस बरसला तर मोठी समस्या येथे निर्माण होईल. रात्री घरात प्रवेश कसा करावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Web Title: Hanuman Lake 'Overflow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.