‘हर्ष’च्या वाढदिवशी हागणदारीमुक्तीचा संदेश
By Admin | Published: January 31, 2015 11:13 PM2015-01-31T23:13:32+5:302015-01-31T23:13:32+5:30
लहान मुलांचा वाढदिवस म्हटला की, घरातील मोठ्यांची रेलचेल असते. मुलाला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांसह भेटवस्तुची अपेक्षा असते. मात्र तुमसर तालुक्यातील देवरीदेव येथील हर्षकुमारच्या वाढदिवसाला
भंडारा : लहान मुलांचा वाढदिवस म्हटला की, घरातील मोठ्यांची रेलचेल असते. मुलाला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांसह भेटवस्तुची अपेक्षा असते. मात्र तुमसर तालुक्यातील देवरीदेव येथील हर्षकुमारच्या वाढदिवसाला त्याने चक्क वडिल व उपस्थित महिलांकडून शौचालय बांधणीचे अभिवचन घेतले. हर्षच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या कार्यक्रमादरम्यान जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने दिलेल्या जनजागृती संदेशातुन देवरीदेव येथील महिलांनी असा निर्धार केला आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व पंचायत समिती तुमसर गटसाधन केंद्र यांच्यावतीने आंतरव्यक्ती संवाद उपक्रमांतर्गत देवरीदेव येथील ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियान व शौचालय बांधणी याची जनजागृती करण्याच्या दृष्टीने महिलांची सभा ठेवली होती. यात वैयक्तिक शौचालयाचा २०१४-१५ च्या आराखड्यात शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी महिला जनजागृतीसाठी ही सभा २८ जानेवारीला घेण्यात आली होती. या सभेला सरपंचा प्रेरणा उमेश तुरकर, उपसरपंच मुलचंद पारधी, सदस्या निलवंता भागवत, उषा प्रितम नाईक, डिलेश्वरी पटले, शांता पटले, सरिता रिनाईत, शकुंतला रिनाईत, रोजगार सेवक व संगणक तज्ज्ञ उपस्थित होते. सभेदरम्यान गावातील ईश्वरदयाल पटले यांच्या पाच वर्षीय हर्षकुमार याचा वाढदिवस असल्याने लाऊडस्पिकर सुरु होता.
हे औचित्य साधून जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, गटसमन्वयक पल्लवी तिडके, समुह समन्वयक शशिकांत घोडीचोर, अनिता कुकडे, हर्षल ढोके यांनी सरपंचा पे्ररणा तुरकर यांच्या माध्यमातून ईश्वरदयाल पटले यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या घरी सुरु असलेल्या कार्यक्रमात शौचालय बांधणीची जनजागृती करण्याचे ठरविले.