नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावो : भक्तांनी घातले चांदपुर येथील हनुमंताला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:29 AM2021-01-02T04:29:10+5:302021-01-02T04:29:10+5:30
नागरिक सहपरिवार जाऊन निसर्गाचा सान्निध्यात नवीन वर्ष साजरे करत असतात. आधीच २०२० या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांना मोठा त्रास ...
नागरिक सहपरिवार जाऊन निसर्गाचा सान्निध्यात नवीन वर्ष साजरे करत असतात. आधीच २०२० या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांना मोठा त्रास झाला आहे, पण आता २०२१ हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो यासाठी पर्यटकांनी हनुमान देवस्थानात येऊन साकडे घातले आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही भगवंताच्या दर्शन व पर्यटन असे दोन्ही एकाच ठिकाणी होत असल्याने लोकांनी चांदपूर हे ठिकाण निवडले असल्याचे पर्यटकांनी सांगितले. चांदपूर देवस्थान सातपुडा पर्वतरांगेत उंच टेकडीवर आहे. मंदिराच्या पायथ्याशी चांदपूर जलाशय असून हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य झाडांनी व्यापलेला विस्तीर्ण जलाशय आहे. त्यामुळे नवीन वर्षात भंडारा जिल्हा व व लागून असलेल्या मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक यांनी भेट दिली. जलाशय विस्तीर्ण असला तरी येथे बोटिंगची व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटकांची निराशा होते. यावर्षी जलाशयात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे पर्यटक त्याकडे आकर्षित होतात. जलाशयाच्या जवळ काठावर फराळाची दुकाने नाहीत त्यामुळे दुरून येणाऱ्या भाविकांना निराश व्हावे लागते. शासनाने चांदपूरला पर्यटनाचा दर्जा दिला परंतु पर्यटनाचा विकास अजूनपर्यंत झाला नाही. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. पर्यटन स्थान म्हणून विकास झाल्यास राज्य शासनाला महसूलही मिळेल व स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे
फोटो