भंडाऱ्यातील बाजारपेठेत ‘हापूस’ आंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:34 PM2018-06-05T22:34:25+5:302018-06-05T22:35:22+5:30

फळांचा राजा आंबा भंडारा जिल्ह्यात पोहोचला आहे. कडक उन्हात रसांच्या आंब्याची मागणी वाढली आहे. डझनाने विकणारा महागडा हापूस बीटीबीत आला आहे.

'Hapus' Mango in the Bhandara Market | भंडाऱ्यातील बाजारपेठेत ‘हापूस’ आंबा

भंडाऱ्यातील बाजारपेठेत ‘हापूस’ आंबा

Next
ठळक मुद्देनागरिकांचीही पसंती : दरदिवशी आठ टन आब्यांची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : फळांचा राजा आंबा भंडारा जिल्ह्यात पोहोचला आहे. कडक उन्हात रसांच्या आंब्याची मागणी वाढली आहे. डझनाने विकणारा महागडा हापूस बीटीबीत आला आहे.
नैसर्गिकरित्या विषमुक्त आंबा बीटीबीत मिळत असल्याने दररोज आठ टन एवढा आंबा विकत आहे. देशभरात आंब्याला मोठी मागणी आहे. फळांचा राजा म्हणून ज्याचा सन्मान आहे.
तो आंबा सामान्यांना आता सामान्य दरात बीटीबीतून उपलब्ध होत असल्याने दैनंदिन आंब्याची विक्री जोमात वाढली आहे. रत्नागिरीतून हापूस कच्च्या स्वरुपात येऊन दोन दिवसात नैसर्गिक प्रक्रियेने पकवून ग्राहकांना विकला जात आहे.
एप्रिलच्या मध्यापासून भंडारा जिल्ह्यातील आंबा विक्रीला उपलब्ध झाला असला तरी दर मात्र सामान्यांच्या पचनी पडत नव्हते. पण जिल्ह्यातील शेतकरी उघड्यावर येऊ नये म्हणून जिल्ह्यातील आंबा जिल्ह्यातच विकून शेतकºयांना अधिकतम दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बीटीबीतून करण्यात आला.
जिल्ह्यातला आंबा कमी झाल्याने कोकणातून (रत्नागिरी) कानपूर (उत्तरप्रदेश) इथून दररोज आंब्याचे ट्रक बीटीबीत येत असून भंडारावासीयांना उत्तम आंब्याची चव चाखायला मिळत आहे.
आंब्यात विविध जाती असल्या तरी हापूस, दसेरी, लंगडा, केसर, लालबाग यासारखी आंबे बीटीबीत दाखल झाली आहेत.
यात हापूस ६० रु., दसेरी ४० रु., लंगडा ४० रुपये, केसर ५० रुपये, लालबाग ३० रुप. प्रती किलोें विकत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्याना लोणच्याकरिता आंबा २.२५ किलो दराने विकत आहे.
भंडारा जिल्ह्यात आंब्याला मोठी मागणी आहे. विषमुक्त आंबा म्हणजे अमृतच असते. जिल्ह्यातील आठवडी बाजारात आंबा विकला जात आहे. पण तो विषमुक्त आहे का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अन्न व औषधी प्रशासन जागे नसल्याने विषयुक्त आंबा गरीबांच्या माथी मारले जात आहे का? हाही प्रश्न तितकाच महत्वाचा असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

भाजीपाल्याची शेती जशी समाधानाने फुलत असून जिल्हाबाहेर मागणी वाढली. त्याचप्रकारे शेतकऱ्यांनी फळांची शेती फुलवावी. जेणे करून आर्थिक उन्नती साधायला अडचण राहणार नाही. यावर्षी पपईचा बाग फुलविला आहे.
-बंडू बारापात्रे,
अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा

Web Title: 'Hapus' Mango in the Bhandara Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.