हरदोलीचा पंचशील क्रिकेट क्लब अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:35 AM2021-01-25T04:35:52+5:302021-01-25T04:35:52+5:30
क्रिकेट स्पर्धेत ३२ संघांचा सहभाग इंटर व्हिलेज स्पर्धेचे समापण चुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील युवा खेळाडूंकरिता हरदोली ...
क्रिकेट स्पर्धेत ३२ संघांचा सहभाग
इंटर व्हिलेज स्पर्धेचे समापण
चुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील युवा खेळाडूंकरिता हरदोली येथील पंचशील क्रिकेट मैदानावर इंटर व्हिलेज स्पर्धेचे आयोजन मोहगाव खंदानचे सरपंच उमेश कटरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा कटरे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव धनंजय दलाल यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहगाव खंदानचे सरपंच उमेश कटरे, माजी सभापती धनेंद्र तुरकर, तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा कटरे, उमेश तुरकर, हेमंत महाकाळकर, बाळा गभने, किशोर वाघमारे, सरपंच नितीन गणवीर, इंद्रपाल सोलंकी, शिवशंकर पटले, डॉ. रमेश पारधी, मनोज पारधी, रामू चौधरी, विजय पटले, मधुकर कटरे, सुकलाल सिंदपुरे, माणिक आगाशे, अशोक खरवडे, कादर अन्सारी, प्रभूदास पारधी, गजानन लांजेवार, सेवकराम कटरे, उपेंद्र पटले, सुरेश काटवले, अनिल पारधी, मनोहर कावळे, चंदू बन्सोड, इंदू कटरे उपस्थित होते. प्रारंभी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव रहमतकर यांच्या हस्ते व रामदयाल पारधी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्कड राणे, अमृत पटले उपस्थित होते. चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील युवा खेळाडूंकरिता या इंटर व्हिलेज क्रिकेट स्पर्धेचे सरपंच उमेश कटरे यांनी आयोजन केले होते. १३ गावांमधील ३२ संघांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे विजेतेपद पंचशील क्रिकेट क्लब, हरदोली यांनी पटकावले तर उपविजेतेपद इंडियन क्रिकेट क्लब, चुल्हाड आणि तृतीय क्रमांक सिंदपुरी येथील संघाने पटकावला. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला. मॅन आॅफ दि सिरीज कशीस गजभिये यांना देण्यात आले. या स्पर्धेचे समालोचन गजानन लांजेवार यांनी केले. धनेंद्र तुरकर यांनी आभार मानले. या क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता बालू कटरे, कुणाल गजभिये, गणेश किंदरले, निखील नागदेवे, सुभम पारधी, विक्रम काटवले, कशीस गजभिये, सुभाष किंदरले, शब्बीर सय्यद, विश्वास काटवले, पंकज खडसन, मनोज निवारे, दिनेश सलाम, मझहर सिद्दकी, अनुज कावळे, सुदर्शन नगरधने यांनी प्रयत्न केले.