कापणीयोग्य धानपीक पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:53 PM2017-10-09T22:53:50+5:302017-10-09T22:54:17+5:30
शेतकºयांनी कशी बशी रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकºयांचे उभे पिक वाळु लागेल होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शेतकºयांनी कशी बशी रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकºयांचे उभे पिक वाळु लागेल होते. वीजपुरवठा नियमित राहत नसल्याने अनेक शेतकरी बांधवांनी इजिन पंपाच्या साहाय्याने धान पिकाला वाढविले. आणि लष्करी अळी पडली, उसनवार घेऊन किंवा व्याजाने औषधे घेऊन फवारणी केली. परंतु आता तो मेटाकुटीला आला आहे.
लष्कर अळी, भारनियमन, डोक्यावर असणारा कजार्चा डोंगर, सततची नापिकी यासारख्या अनेक समस्यांनी शेतकरी माय-बाप हवालदिल झालेला असताना. शेतातील उभे पिक वाळु लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. भूगभार्तील पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतकरी यांच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. अनेक प्रकारच्या उपाययोजना आखून धान पिक जोमात आले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून, कापनीसाठी आलेल्या धानाला या पावसाचा फटका बसला आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकºयाच्या शेतातील कापनीसाठी आलेले उभे पिक जास्त पाण्यामुळे कुजले, तर काही ठिकाणी धानाच्या लोबाना अंकूर फुटले आहे. त्यामुळे हातात आलेले पिक, हातातून निसटून जाण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यातील ४० टक्के शेतकरी यांचे पिक कापणीला आली आहेत. मात्र तिन दिवसापासुन लागून पडलेल्या पावसामुळे धानाची कापनी करू शकत नाही. लाखांदूर तालुक्यातील मोहरणा परिसरातील टेभरी, खैरी/पट, विहीरगाव, गवराळा, खैरणा, दोनाड, डांभेविरली, सावरगाव, मादेड, कुडेगाव, रोहणी, किरमटी या गावातील अनेक शेतकºयाची धान पिके पाण्यामुळे कुजण्याच्या स्थितीत आहेत.
कडपाला सडका वास
पालांदूर : मागील तीन दिवसापासून पालांदूर परिसरात परतीच्या पावसाची हजेरी कायम असल्याने धानपिकाला सुमार नुकसान पोहचत आहे. कापलेल्या धानाच्या कडपांना सडका वास सुटला असून भुईसपाट धानसुद्धा सडण्याच्या मार्गावर असून साचलेले पाणी बांधणातून काढण्याचा प्रयत्न शेतकरी जीव ओतून करीत आहे. ही वास्तविकता हजारो हेक्टरात पालांदूर परिसरात अनुभवायला मिळत आहे.
हातातोंडाशी आलेले धानपिक निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले असून शेतकरी पुरता हतबल झाला आहे. निसर्ग शेतकºयांच्या पाचविलाच पुजला असल्याने जगावे का मरावे अशी अवस्था झाली आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे असह्य होत आहे.
पिकविमा मिळणार का?
अचानकपणे निसर्गाने अवकृपा करीत सुसाटवाºयासह जोरदार पाऊस झाला. यात पालांदूर परिसरातील हजारो हेक्टरमधील धानपिकाची नुकसान शक्य आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.