आध्यात्मिक विचारसरणी बाळगा
By admin | Published: February 6, 2017 12:23 AM2017-02-06T00:23:21+5:302017-02-06T00:23:21+5:30
विज्ञानाच्या युगात प्रशासकीय सेवेत काम करताना प्रत्येकाने नविन तंत्रज्ञान व आधुनिक कार्यपध्दतीचा स्विकार करावा.
विनीता साहू : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सहृदय सत्कार
भंडारा : विज्ञानाच्या युगात प्रशासकीय सेवेत काम करताना प्रत्येकाने नविन तंत्रज्ञान व आधुनिक कार्यपध्दतीचा स्विकार करावा. प्रत्येक शासकीय विभागात एक सक्षम व यशस्वी प्रशासकीय अधिकारी तयार होईल. तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन स्पर्धेचे व धावपळीचे झाले असून आता आत्मिकशांती, संयम व मानसीक समाधानाकरिता अध्यात्मिक विचारसरणी बाळगणे ही सुध्दा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी व्यक्त केले.
अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधिक्षक आर. एम. बडकस हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्ती कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. बडकस यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पोलीस अधीक्षक साहू यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गैरविण्यात आले. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, पोलीस उपअधिक्षक बी. आर. गाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन भैय्या धोटे यांनी केले. आभार प्रशांत कारंजकर यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक जी. डी. राऊत, ए. टी. लोळे, व्ही. बी. वाकडे, बी. आर. पुसाटे, एम. के. प्रधान, एस. एस. वडनेरकर, यु. सी. नायक, व्ही. एम. कडू, जे. सी. मिश्रा, ए. ए. शिवणकर, एन.एन. पशिने, एस. एस. टेंभूरकर, एम. एस. लिमजे, पी. एस. गोखले, एस. एम. जमईवार, आतिब पटेल यांच्यासह कार्यालयीन शाखेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)