खाद्य पदार्थातील भेसळ आरोग्यासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:26 AM2019-09-01T00:26:36+5:302019-09-01T00:27:21+5:30

ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पामोलीयन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तल गोठायला सुरुवात होते. भेसळीचा प्रकार उघडकीस येत आहे.

Hazardous to adulterated foods | खाद्य पदार्थातील भेसळ आरोग्यासाठी घातक

खाद्य पदार्थातील भेसळ आरोग्यासाठी घातक

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न पुरवठा विभागाची डोळेझाक, तेलातून होतेय भेसळ

भंडारा : सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्य सामग्री व तेलाची विक्री होते. या दिवसांत भेसळीला उधाण येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून अन्न भेसळ विभागाचे अधिकारीसुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपाहारगृहात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असला तरी याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.
ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पामोलीयन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तल गोठायला सुरुवात होते. भेसळीचा प्रकार उघडकीस येत आहे. काहींनी आता गोठणारे पामोलीयन तेल तूर्तास भेसळ करणे थांबविल्याचे सुध्दा सांगितले जाते.
तांदूळ, साखर, डाळ, रवा, बेसन, पीठ, एवढेच नव्हेतर गव्हामध्येसुध्दा सर्रास भेसळ सुरू आहे. रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीकरिता दिसायला लागला आहे. भेसळ करणारे कोट्यधीश झाले तर गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र अन्न , भेसळ विभागाचे अधिकारीच मूग गिळून बसले आहे. एखाद्या दुकानात धाड टाकलीच तर शुध्द आणि नामांकित कंपनीच्या पुड्यातील तेल किंवा अन्नपदार्थ नमुनादाखल घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविले जात आहे. यामळे हे नमुने कधी बदलले याबाबत ग्राहकांच्या लक्षात येतच नाही.
केवळ खिसेभरू धोरण असल्याने गोरगरीबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे गरिबांच्या पैशातून वेतन घेणाºया निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना कोण आवळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना या अन्नभेसळीमुळे आजाराला आमंत्रण द्यावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन संबधित विभागाने धडक मोहिम राबविण्याची मागणी आहे.

उपहारगृहात नियमांना तिलांजली
शहरासह जिल्ह्यातील उपहारगृहामध्ये हजारो ग्राहक नास्ता, जेवण घेतात. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. कामावरील मानसांचे आरोग्य तपासणी केल्या जात नाही. तर नियमांना तिलांजली देऊन उपाहारगृहाचे सर्रास व्यवसाय सुरु आहे. असे असतानाही प्रशासन मात्र दुर्लक्ष करुन वेळ मारुन नेत असल्याचा प्रकार सुरु आहे, असा सूर अनेकांनी व्यक्त केला.

Web Title: Hazardous to adulterated foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न