हजरत मोहमंद पैगंबर मानवतेचे प्रतिक -मुफ्ती साजिद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:26 AM2017-12-05T00:26:14+5:302017-12-05T00:26:30+5:30
हजरत मुहम्मद पैगंबर साहब हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : हजरत मुहम्मद पैगंबर साहब हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. मानवतेचे प्रतिक मोहम्मद पैगंबरांनी पवित्र कुराण ग्रंथातून सर्व धर्मियांसाठी शांतीचा संदेश दिला. मानवी जीवन जगण्याकरिता कानून बनविले. समाजातील सर्व मानव समुहाला बरोबरीचा हक्क, दर्जा देवून स्त्रियांना सन्मान, शिक्षणाचा अधिकार, सामाजिक अधिकार मोहम्मद पैगंबर साहेबांनी दिला, असे उद्बोधन मुक्ती मो. साजिद यांनी केले.
ईद-ए-मिलादच्या पावन व पवित्र पर्वावर मोहम्मद पैगंबर साहेबांचा मानवतेचा संदेश सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने जमीयत- उलमा भंडाराच्या वतीने ‘पैगामे इंसानियत’ या कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम लायब्रेरी कल्चरल सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, अन्य प्रतियोगिता आदी उपकम घेण्यात आले. यावेळी शंभर १०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. २५ लोकांनी रक्तदान केले.
१ डिसेंबरला ईद मिलाद निमित्त मुस्लिम लायब्रेरी हॉलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जमी अते उलमा भंडाराचे अध्यक्ष मुक्ती मो. साजिद, मौलाना सिराज हमद कासमी, मुक्ती मो. रोशन कासमी, दारूल उलुम सोनुली, मुक्ती मो. अजफार मजाहिरी, मौलाना हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी अध्यक्ष जमीअले उलमा महाराष्ट्र आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी समाजबांधवांनी उत्साहपूर्ण वातावरणात शहरातून रॅली काढली.
सिराज अहमद कासमी, मुक्ती मो. रोशन कासमी, मुक्ती मो. अजफार मुजाहिरी, हाफिज मो. नदीम सिद्दीकी आदींनी ही मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जीवन पटलावर प्रकाश टाकला. त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची या प्रसंगी अमूल्य माहिती व त्यांची शिकवण दिली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन मुक्ती मो. साजिद यांनी केले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने भंडारा वासियांची आवर्जून उपस्थिती होती. उलमाचे महासचिव फराज अहमद, बाबु हाफिज, हाफिज अबरार, कारी अयुब, वसीम खान, हाफिज रहतेशाम, हाफिज, इमरान, हाफिज मियाज, हाफिज ईशाद, हाफिज सैफी यांनी प्रामुख्याने सहकार्य केले. सहयोगी होे. शम्मुभाई, शुज्जा खान, जुबेर भाई, शादाब पाशा, अवेश खान यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.