गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करुन त्याने गाठले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:10 AM2017-12-12T00:10:42+5:302017-12-12T00:11:01+5:30

बसस्थानक परिसरात गॅस शेगडी दुरूस्तीचे छोटेसे दुकान थाटून मिळेल त्या पैशात कुटुंबाचा गाडा चालविणासह शिक्षण पूर्ण करीत सुरेशने समाजशास्त्र विषयात पहिला क्रमांक पटकावित चार सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.

He achieved the success of gas stove repair | गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करुन त्याने गाठले यश

गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करुन त्याने गाठले यश

Next
ठळक मुद्देलोकमत शुभ वर्तमान : चार सुवर्णपदकांनी सुरेशला गौरविले

आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : बसस्थानक परिसरात गॅस शेगडी दुरूस्तीचे छोटेसे दुकान थाटून मिळेल त्या पैशात कुटुंबाचा गाडा चालविणासह शिक्षण पूर्ण करीत सुरेशने समाजशास्त्र विषयात पहिला क्रमांक पटकावित चार सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. यात त्याने गरिबीवर मात करून शिक्षण कसे पूर्ण करायचे यासाठी स्वत:चा नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.
अत्यंत गरीब घराण्यातील सुरेश देशपांडे याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या एम.ए.समाजशास्त्र विषयात सी.जी.पी.ए. श्रेणीत १० पैकी ९.५० घेऊन विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावला आहे. कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह, रेशीम बाग नागपुर येथे नुकताच संपन्न झालेल्या १०४ वा दिक्षांत समारंभात या विद्याथ्यार्ला चार सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले आहे. सुरेश हा सध्या लाखांदूर येथे गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करीत आहे. सुरेश मुळचा गोंदिया जिल्ह्यातील इसापूर या गावातील आहे. गॅस शेगडी दुरुस्ती करून अभ्यासक्रम पूर्ण करुन अत्यंत कष्टाने त्यांनी ही पदविका मिळवली आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना शिक्षण पूर्ण करू शकत नसल्याने सुरेशने मनात काही तरी करुन दाखविण्याचा निश्चय केला. लाखांदुर येथील बस स्थानकावर गॅस शेगडी दुरुस्ती दुकान चालू केली. या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाºया मोबदल्यातुन पुढील शिक्षण चालू ठेवले होते. सुरेशला सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं तेव्हा त्यांने या यशासाठी आपल्या गुरुजनांचे व सहकारी मित्राचे आभार मानले. कारण इसापूर येथुन लाखांदुरला आल्यानंतर हिंमत न हरता त्यांने मित्र परिवाराच्या मदतीनं विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका मिळवली.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरेशचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. आपण जिवनात यशस्वी होऊन आपल्या प्रमाणे समाजातील इतर विध्यार्थी घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर गरिबीतून कस मार्ग काढता येत यावर पुस्तक लिहिण्याची त्यांची इच्छा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहीत्य मंच लाखांदुरच्या वतीने सुरेशचा सत्कार करण्यात आला असून, यावेळी नगरसेवक हरीष बगमारे, दिनेश कुडेगावे, पं.स.सदस्य शिवाजी देशकर, निलेश बगमारे, आदित्य बगमारे, लीलाधर ढोरे आदी उपस्थित होते.

Web Title: He achieved the success of gas stove repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.