अनाथ मुलांना त्यांनी दिली मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:36+5:302021-06-23T04:23:36+5:30

जन्मदात्या माय-बापाचे छत्र हिरावलेल्या निरागस मुला-मुलींना अन्नधान्यासह इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका प्रा. डॉ. ...

He gave love to orphans | अनाथ मुलांना त्यांनी दिली मायेची ऊब

अनाथ मुलांना त्यांनी दिली मायेची ऊब

Next

जन्मदात्या माय-बापाचे छत्र हिरावलेल्या निरागस मुला-मुलींना अन्नधान्यासह इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका प्रा. डॉ. सविता बेदरकर, समाजशील शिक्षक अनिल मेश्राम यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील दानदात्यांच्या सहयोगाने नियमित केला जातो. रविवारी (दि. २०) फादर्स डे दिवसाचे औचित्य साधून सौंदड येथील शिक्षक अनिल मेश्राम यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील अनाथ मुलांचा मनोमिलनासह सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार उषा चौधरी, समाजसेविका सविता बेदरकर, जगदिश लोहिया, दामोधर नेवारे, मधुसूदन दोनोडे, बी. टी. यावलकर, सुखलाल मेश्राम, राजू वैश्य, अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे उपस्थित होते.

जिल्ह्यातील अनाथ मुलांना सढळ हाताने मदत करून सामाजिक दायित्व जपणाऱ्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी ठिकठिकाणाहून आलेल्या अनाथ मुलांशी हितगुज साधली. आस्थेने त्या निरागस मुलांची आपबीती ऐकली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्वत:ला अनाथ, बिचारे समजू नका, तुमच्यासोबत आम्ही आहोत. संकटाला घाबरू नका, जो संकटाशी लढतो, तोच पुढे यशस्वी होतो. माणसाचे जीवन घडविण्याचे काम फक्त शिक्षणच करते, अर्ध्यावर शिक्षण सोडू नका. उच्च ध्येय बाळगा. वेळोवेळी मदतीचे हात तुमच्यासाठी पुढे येतील, असे सांगून स्वत:ची आपबिती कथन करून अनाथांना, अनाथ बालकांना धीर दिला. यावेळी त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी अनाथांना दत्तक घेण्याची याप्रसंगी ग्वाही दिली. संचालन सविता बेदरकर यांनी केले. प्रास्ताविक अनिल मेश्राम यांनी केले.

Web Title: He gave love to orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.