गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 12:42 PM2021-08-16T12:42:54+5:302021-08-16T13:38:25+5:30

Bhandara News भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्?यात गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देण्याचे व्रत एका देशभक्ताने निष्ठेने जोपासले आहे.

He has been doing free ironing of the national flag for the last fifteen years | गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री

गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री

Next


दयाल भोवते
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्?यात गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देण्याचे व्रत एका देशभक्ताने निष्ठेने जोपासले आहे. भोजराज फागो कडीखाये रा. लाखांदूर असे त्याचे नाव असून त्याचा इस्त्रीचा व्यवसाय आहे.
कपडे धुवून त्यांना इस्त्री करून ग्राहकांना देणे हे त्यांचे वडिलोपार्जित काम. त्यांच्या आजोबांच्या काळापासून कपड्यांना इस्त्री करून दिली जात आहे. त्यांचे लाखांदूर येथे मानव लॉन्ड्री नावाने कपड्यांना इस्त्री करण्याचे दुकान आहे. वर्षभर या दुकानांमधून स्थानिक लाखांदूर येथील नागरिकांचे कपडे धुवून व प्रेस करून दिले जातात.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन या तीन राष्ट्रीय सणांच्या दिवशी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात, निमशासकीय कार्यालयात व शाळा महाविद्यालयात राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो. तो दिवस निघून गेला की संध्याकाळच्या दरम्यान शासकीय नियमात राष्ट्रध्वजाला उतरवले जाते. त्यानंतरच्या दुस?्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्याच राष्ट्रध्वजाचा पुन्हा वापर केला जातो. मात्र सुरुवातीला वापर केल्यानंतर राष्ट्रध्वजाला घड्या पडल्या असल्याने त्याला इस्त्री करणे आवश्यक असते. सध्याच्या घडीला सर्वत्रच पैसे घेऊन इस्त्री करून देऊन आर्थिक व्यवहार केले जात आहेत मात्र अशाच राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देऊन एक नवीनच देशसेवा येथील तरुण करत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


इथे देताहेत सेवा

गत काही वषार्पासून लाखांदूर येथील पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, नगरपंचायत कार्यालय, मडेघाट येथील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात आथली, सेवा सहकारी संस्था कार्यालय लाखांदूर, ग्रामपंचायत कार्यालय असोला, शिवाजी प्राथमिक शाळा लाखांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखांदूर येथून दरवर्षीच राष्ट्रध्वज धुवून इस्त्री करण्यासाठी येत असल्याची माहिती भोजराज कडीखाये यांनी दिली आहे.

Web Title: He has been doing free ironing of the national flag for the last fifteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.