ते ७० वर्षांपासून सांभाळताहेत भजनाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:10+5:302021-09-18T04:38:10+5:30
लाखांदूर : गत ७० वर्षांपूर्वी भजनी मंडळाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण शहरामध्ये निर्माण करण्याचे कार्य लाखांदूर येथील श्री संत गाडगेबाबा ...
लाखांदूर : गत ७० वर्षांपूर्वी भजनी मंडळाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण शहरामध्ये निर्माण करण्याचे कार्य लाखांदूर येथील श्री संत गाडगेबाबा भजनी मंडळ करीत आहे. ही भजनाची परंपरा आजही जोपासत असून, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करीत आहेत.
या भजनी मंडळाची स्थापना १९९६ रोजी लाखांदूर येथे झाली. गत ७० वर्षांपासून भजनी मंडळाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण शहरामध्ये निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. या माध्यमामधून संस्कार व सांस्कृतिकपणा जपलेला आहे. कोणतेही आमिष न घेता भजनी मंडळ धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत असतो.
या भजन मंडळाची स्थापना गोदरु कडिखाये यांनी ७० वर्षांपूर्वी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन केली. तोच वसा येथील श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीचे सचिव मार्गदर्शक फागो कडिखाये यांनी परंपरा कायम ठेवून आज रोजी संबंधित भजनी मंडळ कायम अविरत सुरु आहे. भजनी मंडळामध्ये अनेक बाल-गोपाल सहभागी होऊन जडण-घडणाचे कार्य येथे होते. भजनी मंडळ सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, जन्माष्टमी, गौरी, श्रावणमास, नवरात्री, भागवत सप्ताह, काकड आरती, अंत्ययात्रा, गणेशोत्सवात अनेकांच्या घरी भजन मंडळ सहभाग घेत असतो. यातून मंडळाच्या सुरेल भजनाला मागणी वाढली आणि लाखांदूर शहर आणि परिसरात त्यांचे भजनाचे कार्यक्रम सुरू झाले. संतपरंपरेतून सुरू असलेल्या वारकरी सांप्रदायिक भजनाची गोडी सध्याच्या आधुनिक युगात रिमिक्स जमान्यात काहीशी कमी होत असल्याचे दिसते. ही भजन परंपरा टिकून राहावी व आजच्या तरुणाईला तिची गोडी लागावी, या हेतूने काही प्रसिद्ध भजनप्रेमी आणि संगीत संस्थांनी पुढाकार घेऊन या भजनाला शास्त्रीय स्वरूप दिले. तिथूनच खरी संगीत भजनाला सुरुवात झाली. यात लाखांदूरच्या श्री संत गाडगेबाबा भजन मंडळ यांचा समावेश आहे.
आज तिसऱ्या पिढीतील बालगोपालांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. त्यामध्ये मानव कडिखाये, नितीन पारधी, कुणाल प्रधान, भोजराज एफजी कडिखाये, गणेश ठाकरे, सुरेश नेवारे, हरिदास राऊत, हेमराज प्रधान, रमेश खरकाटे, रामकृष्ण दिवटे, वसंता गुरनूले, सूरज तलमले, मंगेश मोहुर्ले, प्रकाश राऊत, गणेश कार, योगेश भुते, संजू वाटगुळे, आदित्य वाटगुळे, प्रेमानंद गुरनूले, उन्नती कडिखाये, अरुणा कडिखाये यांच्यासह या भागातील बालगोपाल ही परंपरा जोपासत आहेत.
170921\1315-img-20210917-wa0006.jpg
गणपती दरम्यान भजन सादर करतांना भजनी मंडळ