साधी राहणी, उच्च विचारसरणी असा त्यांचा स्थायिभाव होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:25+5:302021-09-27T04:38:25+5:30
भंडारा तालुक्यातील चिखली येथे कैलास मेहर यांच्या निवासस्थानी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत ...
भंडारा तालुक्यातील चिखली येथे कैलास मेहर यांच्या निवासस्थानी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. जयंती कार्यक्रमासाठी प्रामुख्याने तेजराम वाघमारे, शांताराम गायधने, प्रकाश गायधने, गणपत मेहर, हरिदास वाघमारे, रोहित हटवार, रमेश मेहर, नितेश मेहर, उमराव मेहर, आकाश वाघमारे, रोहित चरडे व बुथ क्रमांक ४२ चे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिमापूजन तालुका महामंत्री विष्णुदास हटवार, बुथ अध्यक्ष राजेश वाघमारे, गणपत मेहर, निखिल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुथ अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी गावातील सर्वांनी एकाच छताखाली एकत्र येत शेतकरी, शेतमजुरांसह परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर संघटन गरजेचे असून, शासनाच्या विविध योजनांस गावापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. यावेळी गावातील कैलास मेहर, निखिल वाघमारे, गणपत मेहर, तेजरामजी वाघमारे यांनी विचार मांडले. संचालन बुथ अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी केले. आभार निखिल वाघमारे यांनी मानले. चिखलीत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रम घेत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
बॉक्स
साकोलीत पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती
साकोली : महान तत्त्वचिंतक, संघटनकर्ते, भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य, प्रखर राष्ट्रवादी व्यक्तिमत्त्व पं. दीनदयाल उपाध्याय यांची साकोली येथे जयंती साजरी करण्यात आली. साकोली तालुका भाजपच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजप जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, भाजप अनु. जाती. मोर्चा प्रदेश सचिव डॉ. नेपाल रंगारी, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा इंद्रायणी कापगते, भाजप विधानसभा पालक ॲड. बापूसाहेब अवचटे, साकोलीनगर परिषद अध्यक्षा धनवंता राऊत, भाजप तालुका अध्यक्ष लखन बर्वे, देवनाथ राहंगडाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बाळाभाऊ काशिवार यांनी पंडित दीनदयाल यांच्या जीवनावर मार्गदर्शन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भारतीय जनसंघ आपल्या देशातील गरजू, गरीब जनतेचे हित कसे साधता येईल, असे विचार मांडले.