मुख्याधिकारी निघाले प्लास्टिक गोळा करायला

By admin | Published: June 7, 2015 12:45 AM2015-06-07T00:45:15+5:302015-06-07T00:45:15+5:30

पर्यावरण दिनानिमित्त येथील नगर परिषदेने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन शहरवासीयांना आश्चर्यचकीत करून....

The headlines come out to collect plastic | मुख्याधिकारी निघाले प्लास्टिक गोळा करायला

मुख्याधिकारी निघाले प्लास्टिक गोळा करायला

Next

पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम : बाजारात पडलेले प्लास्टिक केले गोळा
गोंदिया : पर्यावरण दिनानिमित्त येथील नगर परिषदेने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन शहरवासीयांना आश्चर्यचकीत करून सोडले. पालिकेने बाजारात टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्याची मोहीम राबविली. विशेष म्हणजे अन्य कर्मचाऱ्यांसह खुद्द मुख्याधिकाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेत प्लास्टिक गोळा केले.
सर्वप्रथम पालिकेच्या सभागृहात पर्यावरण दिनानिमित्त समस्त कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी सुमंत मोरे होते. तर उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे प्रमुख्याने उपस्थित होते. बैठकीत उपस्थित सर्वांना पर्यावरण दिनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पर्यावरण दिनाचे निमित्त साधून बाजारात पडलेले प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले.
त्यानुसार, मुख्याधिकारी मोरे स्वत: पालिकेतील अन्य कर्मचाऱ्यांसह प्लास्टिक गोळा करण्याच्या मोहिमेत शामील झाले. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान त्यांनी कर्मचाऱ्यांसह प्लास्टिक गोळा केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The headlines come out to collect plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.