वेतन बंदच्या धसक्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:42 PM2019-03-06T22:42:16+5:302019-03-06T22:42:32+5:30
अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाने न केल्यामुळे वेतन बंद झाले याचा मानसिक परिणाम होऊन आश्रमशाळेतील मुख्याध्यापक प्रमोद शेंदरे (५०) यांचा मृत्यू झाला. ते मेंढा (गोसे) येथील बाबा खंताळू प्राथमिक आश्रम शाळेत कार्यरत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाने न केल्यामुळे वेतन बंद झाले याचा मानसिक परिणाम होऊन आश्रमशाळेतील मुख्याध्यापक प्रमोद शेंदरे (५०) यांचा मृत्यू झाला. ते मेंढा (गोसे) येथील बाबा खंताळू प्राथमिक आश्रम शाळेत कार्यरत होते.
शासनाने सदर आश्रम शाळेची मान्यता रद्द करुन ही शाळा दुसऱ्या संस्थेला हस्तांतरीत करण्याकरिता प्रस्ताव मागितले आहेत. सदर काम थंड बस्त्यात आहे.परिणामी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन बंद झाल्यामुळे अगोदरच कर्जाच्या ओझ्याखाली असणाºया मुख्याध्यापक प्रमोद शेंदरे हे मानसिक तणावात होते. घरची जबाबदारी, दोन्ही मुलींचे लग्न, बँक व पतसंस्थेचे व इतरांकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे या विंवचनेत ते होते. अशातच त्यांची प्रकृती ढासळली. वेतन बंद झाल्याचा धसका त्यांनी घेतला.