धुळ कणांमुळे आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:12 PM2018-07-22T22:12:17+5:302018-07-22T22:12:37+5:30
देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्यावर जळजळ होते. रासायनिक राख असल्याने प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्यावर जळजळ होते. रासायनिक राख असल्याने प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.
देव्हाडी येथे मुंबई- हावडा रेल्वे फाटकावर उडाणपूलाचे काम मागील चार वर्षापासून सुरु आहे. फाटकाच्या दोन्ही बाजूला ‘अप्रोच’ उडाणपूलाचे कामात अदानी वीज कारखान्यातील राखेचा भराव करण्यात आला. पावसाळ्यात उडाणपूलातून पाण्यासह राख पर्यायी रस्त्यावर जमा होत आहे. पाऊस थांबल्यानंतर ही राख रस्त्यावर पडून ती वाळते. त्यानंतर वाहनाच्या रहादारीमुळे ती उडते. वाहने गेल्यावर वातावरणात राखेचा पांढरा थर सर्वत्र दिसतो. समोरची वाहने दिसत नाही.
राख श्वास घेतानी नाकात गेल्यावर खोकला येतो, श्वास घेण्यास त्रास होतो. डोळ्यात गेल्यावर मोठी जळजळ होते. लहान मुले, वृध्दांना मोठा त्रास होतो. पर्यायी रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. या मार्गाने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची वर्दळ आहे, परंतु सर्वच निमूटपणे येथून जात आहेत. वीज कारखान्यातील राख मानवी शरीरास घातक असल्याचे समजते. उडाणपूलाच्या बांधकामाकडे जबाबदार अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.
उडाणपूलाच्या भरावात मुरुमाचा वापर करण्यात आलानाही येथे रासायनिक राखेचा वापर करण्यात आला. उडाणपूलाच्या दोन्ही बाजूला सिमेंट दगडातून लिकेजमुळे पाणी बाहेर निघत आहे. बांधकामात सदोष स्थिती आहे काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. किमान दगडाजवळ मुरुमाचा थर देण्याची येथे गरज होती. १७ ते २० कोटींचे हे बांधकाम आहे. मुरुम उपलब्ध हो तनाही, म्हणून अदानी वीज कारखान्यातील राखेचा उपयोग भरावात करण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मदतीने हा उडाणपूल तयार होत आहे. उडाणपूलावर नागपूर येथील बांधकाम खात्याचे नियंत्रणात कामे सुरु आहेत.
परिसरातील नागरिकांना त्रास, डोळ्याचे आजार बळावले आहे. प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. अनेक तक्रारी केली, पंरतु कारवाई मात्र शुन्य आहे.
अदानीची राख रासायनिक आहे. या राखेमुळे मानवी जिवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पूलात राखेचा भराव करण्याची मंजूरी होती काय? याची चौकशी करण्याची गरज आहे. सतत राखेचा तवंग परिसरात राहणे धोकादायक आहे.
- डॉ. पंकज कारेमोरे
युवा काँग्रेस नेते तुमसर