न्यायासाठी आरोग्य सेवकाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:45 PM2018-02-07T22:45:05+5:302018-02-07T22:46:12+5:30

Health service fasting for justice | न्यायासाठी आरोग्य सेवकाचे उपोषण

न्यायासाठी आरोग्य सेवकाचे उपोषण

Next
ठळक मुद्देउपोषणाचा दुसरा दिवस : विविध संघटनांचा पाठिंबा, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमत
भंडारा : सेवा ज्येष्ठतेत अन्याय करण्यात येत असल्याने आरोग्य सेवकाने जिल्हा परिषदेमसमोर, न्याय मागणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात मंगळवारपासून उपोषण सुरू केले. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.
विनय सुदामे असे उपोषणकर्त्याचे नाव असून ते महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडाराचे जिल्हाध्यक्ष आहेत. विनय सुदामे हे संघटनेत सदैव तत्परतेने कार्यरत राहणारे आहेत. संघटनेच्या माध्यमातून ते मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिकाऱ्यांकडे मांडतात. सुदामे हे मागासवर्गीय असून सेवा ज्येष्ठतेसाठी बऱ्याच कालावधीपासून संघटनेच्या वतीने त्यांनी लढा दिला. त्यानंतर त्यांना नियुक्ती दिनांकापासून सेवा ज्येष्ठता देण्यात आली असताना सुध्दा त्यांना, कायमस्वरूपी सेवा जेष्ठता यादीत त्यांचे नाव मागे टाकून त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचे काम जिल्हा परिषद प्रशासनाकडून हेतुपुरस्पर करण्यात आले आहे. शिफारस व विनंती करूनही न्याय न मिळत असल्यामुळे अखेर न्याय मागणीसाठी सुदामे यांनी मंगळवार पासून जिल्हापरिषद समोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडारा, महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण रोजंदारी मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज रामटेके, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, यांच्यासह विविध संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.
भाजपचे सरकार केंद्र व राज्यात स्थापन झाल्यापासून बहुजन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुजन नागरिकांना एकत्रीत येण्याची गरज असल्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

Web Title: Health service fasting for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.