आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:18 PM2017-10-30T22:18:09+5:302017-10-30T22:18:24+5:30
मतांचे दान घेऊन अनेक जण पळून जातात. मतांचे कर्ज व्याजासहीत फेडण्याकरिता लोकप्रतिनिधींनी सदैव तत्पर राहावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मतांचे दान घेऊन अनेक जण पळून जातात. मतांचे कर्ज व्याजासहीत फेडण्याकरिता लोकप्रतिनिधींनी सदैव तत्पर राहावे. आरोग्य हीच खरी मानव सेवा असून जनतेला आरोग्य शिबिराची गरज आहे. रोगाचे निदान करून रोग पूर्ण बरा होईपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याची ग्वाही ऊर्जामंत्री तथा भंडाºयाचे सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ते तुमसर येथील राष्ट्रीय विद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाआरोग्य शिबिराचे आयोजक आ. चरण वाघमारे, आ. डॉ. परिणय फुके, आ. अनिल सोले, भाजप जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, माजी खा. शिशुपाल पटले, नागपूर जि.प. च्या अध्यक्षा निशा सावरकर, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, आरोग्य उपसंचालक डॉ. जायस्वाल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार गजेंद्र बालपांडे, बाजार समिती सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती अशोक पटले, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार आी उपस्थित होते.
ना. बावनकुळे म्हणाले, जिवनदायी आरोग्य योजनेचा लाभ गरजूंनी घेऊन अपंगाना बॅटरी ट्रायसीकल, साहित्य महाआरोग्य शिबिरातून देण्यात येतात. १० दुर्धर आजारांचा उपचार राज्य शासन करीत आहे. प्रत्येक जि.प. क्षेत्रनिहाय आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. जिल्ह्याला पूर्ण वेळ पालकमंत्री हवा, मुख्यमंत्री संजिवनी योजनेत शेतकºयांनी केवळ २० टक्के रक्कम जमा करायचे आहे. शेतकºयांना केवळ प्रति युनिट एक रूपया द्यावा लागतो तर दुकानदारांना आठ रूपये द्यावे लागतात. महावितरणचे १८ हजार कोटी रूपये थकीत आहेत. खाजगी कारखान्याकडून नगदी वीज खरेदी करावी लागते, असे ना. बावनकुळे यांनी सांगितले. आ. चरण वाघमारे यांनी प्रास्ताविकातून जीवनदायी जिल्हा आरोग्य विभाग, भंडारा, गोंदिया येथील सुमारे २०० डॉक्टरांचे पथक महाआरोग्य शिबिरात दाखल झाले आहे. प्रत्येकांनी तपासणी केली जाणार असून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. बाजार समितीतर्फे १५ स्टॉल्स येथे लावण्यात आले होते. महाआरोग्य शिबिराचे हे दुसरे वर्ष होते. संचालन राहुल डोंगरे, डॉ. शांतीदा लूंगे तर आभार पाटील यांनी मानले. महाआरोग्य शिबिरात नगरसेवक मेहताब सिंग ठाकूर, राजा लांजेवार, राजू गायधने, सचिन बोपचे, पंकज बालपांडे, कैलास पडोळे, प्रमोद घरडे, युवराज जमईवार, अनिल जिभकाटे, मुन्ना फुंडे, कमला शेख, हिरालाल नागपुरे, जि.प. सदस्य संदीप टाले, गुरूदेव भोंडे, राजेश बांते, भरत खंडाईत, उषा जावळे, ललीत शुक्लासह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.