आरोग्यविषयक सर्वेक्षण ऑनलाईन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:00 AM2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:26+5:30

जिल्ह्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, गरोदर महिला व स्तनदा माता, सारी आजार, ताप किंवा इतर प्रकारच्या आजारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

The health survey will be online | आरोग्यविषयक सर्वेक्षण ऑनलाईन होणार

आरोग्यविषयक सर्वेक्षण ऑनलाईन होणार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : ३ लाख १० हजार कुटुंबांवर राहणार आरोग्य पर्यवेक्षकांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देश आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असतानाच जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, गरोदर महिला व स्तनदा माता, सारी आजार, ताप किंवा इतर प्रकारच्या आजारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद कार्यालयातील येथील सभागृहात कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरूवारी (दि.११) आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी नरेश भांडारकर व संजय गणवीर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. नितीन कापसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन नागरिकांची आरोग्याची माहिती कशी भरायची आहे, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात एकूण १३ लाख ७६ हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर तयारी करण्यात येत असल्याचे सांगत डॉ. बलकवडे यांनी, सर्वेक्षणात ज्या नागरिकांना काही आजाराची लक्षणे व ताप असल्यास त्याची माहिती पर्यवेक्षक व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावपातळीवरील चमूद्वारे त्वरीत जिल्हा प्रशासनास उपलब्ध होणार आहे.
अशाप्रकारे पूर्वी ऑफलाईन होणारा सर्व्हे आता ऑनलाईन केला जाणार असल्याने नागरिकांना लवकरात लवकर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे असे सांगीतले.
प्रशिक्षण कार्यक्रमात गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय पाटील, आमगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भुमेश पटले, गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती कुमार, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गगन गुप्ता, सडक-अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षवर्धन मेश्राम, देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललीत कुकडे आणि अर्जुनी-मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

३१०० कर्मचाऱ्यांचे पथक
जिल्ह्यातील तीन लाख १० हजार कुटुंबीयांपर्यंत घरोघरी पोहोचण्यासाठी गावपातळीवरील क्षेत्रीय कर्मचारी असे अंदाजे ३१०० कर्मचाºयांचे पथक तयार करण्यात येत आहे. या पथकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. जेणेकरु न जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे नागरिकांसाठी व आरोग्य यंत्रणेसाठी सुकर होणार असून संसर्ग टाळण्यास मदत होईल.

Web Title: The health survey will be online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य