आरोग्य कर्मचाºयांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:47 PM2017-09-21T23:47:14+5:302017-09-21T23:47:34+5:30
वेळोवेळी निवेदन देऊनही समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. पर्यायाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी दोन दिवसांचा संप पुकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वेळोवेळी निवेदन देऊनही समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. पर्यायाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी दोन दिवसांचा संप पुकारला. यात गुरूवारपासून सुरू झालेल्या संपादरम्यान कर्मचाºयांनी द्वारसभा घेऊन मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले.
सामान्य रुग्णालयातील वर्ग-४ अंतर्गत येणाºया कर्मचाºयांची सेवापुस्तिका भरून देण्यात यावी, जेष्ठता यादीनुसार मुकादम आणि ओ-टी परिचर, ड्रेसर यांना पदोन्नती देण्यात यावी, थकीत भत्ता देण्यात यावा, चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना वैद्यकीय व आर्थिक रजा देण्यात टाळाटाळ न करता त्या देण्यात याव्यात, वर्ग-४ कर्मचाºयांची तीन किंवा चार महिन्यात सभा घेण्यात यावी आदी मागण्या या कर्मचाºयांनी केल्या आहेत.
मागण्यांचे निवेदन गुरूवारी पार पडलेल्या द्वारसभेनंतर अधिकाºयांना देण्यात आले. यापुर्वी झालेल्या सभेत या कर्मचाºयांनी २१ व २२ सप्टेंबरला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. आज या कर्मचाºयांनी संप पुकारला. यावेळी सुरज परदेशी, शेखर बेहुनिया, धनंजय तलमले, नजीर शेख, मनोज सोनेकर, राजू कनोजे, साजन सपतेल, महेश भिवगडे, सुधीर मोगरे, सागर सपतेल, अजय सपतेल, राजू कटकवार, उमेश बोपचे, वसंत बोकडे आदींचा समावेश आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांना पाठविण्यात आले.