आरोग्य सुदृढतेसाठी सकस आहाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:10 PM2017-10-16T22:10:52+5:302017-10-16T22:11:09+5:30
अभ्यास करून बुद्धीमत्ता वाढते. ही बुद्धीमत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना सकस आहाराची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानेगाव : अभ्यास करून बुद्धीमत्ता वाढते. ही बुद्धीमत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना सकस आहाराची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी सकस आहार घेऊन आरोग्य सुदृढ ठेवावे असे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
मानेगाव येथील चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित सकस आहार व वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, गटविकास अधिकारी नूतन सावंत, पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके, प्राचार्य वंदना हटवार, पर्यवेक्षक जे.एस. मेश्राम, संस्थासचिव वसंत हटवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे, मुख्याध्यापिका भाजीपाले, सुभाष गोंदोडे, कार्तिक मेश्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उके यांनी सकस आहाराचे महत्व सांगितले. कार्यक्रमप्रसंगी गटविकास अधिकारी सावंत, कार्तिक मेश्राम, पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांनी मार्गदर्शन केले. पोल्ट्री व्यवसायीक अक्षय पांडे यांनी विद्यार्थ्यांना ६०० केळी व अंड्यांचे वाटप केले. याचा खर्च पांडे यांनी स्वयंस्फूर्तीने केला. प्रास्ताविक डॉ.गुणवंत भडके यांनी केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना मानेगाव येथील कर्मचारी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.