रोवणीला पावसाची दमदार साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:55+5:302021-06-29T04:23:55+5:30

भंडारा जिल्ह्यासह पालांदूर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. बोरवेल, विहीर, फिल्टर यांना पाण्याचा अपेक्षित पुरवठा वाढल्याने रोवणी सुरू झाली ...

Heavy rain accompanied Rovani | रोवणीला पावसाची दमदार साथ

रोवणीला पावसाची दमदार साथ

Next

भंडारा जिल्ह्यासह पालांदूर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. बोरवेल, विहीर, फिल्टर यांना पाण्याचा अपेक्षित पुरवठा वाढल्याने रोवणी सुरू झाली आहे. महिला मजुरांना १३० ते १५० रुपये मजुरी मिळत असून, हुंडा पद्धतीत २८०० रुपये प्रतिएकरचा दर सुरू झालेला आहे. पावसाची नियमितता कायम राहिल्यास कोरडवाहू शेतकरी आठवडाभरात रोवणी करू शकेल.

कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार दहा टक्के खताची मात्रा कमी करून खरीप हंगाम सजविण्याचा प्रयत्न बळीराजा करतो आहे. कमी खर्चात व्यवस्थित रोवणी होत असल्याने शेतकरी रोवणीकडे अधिक लक्ष देत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता असून, सायंकाळच्या सुमारास पालांदूर येथे दमदार पावसाने हजेरी लावली. गत तीन दिवसांपासून रात्रीलाच पाऊस येत असल्याने थंड वातावरणात आल्हाददायक वातावरणाची निर्मिती झालेली आहे. आर्द्रा नक्षत्राला कोल्हाचे वाहन असल्याचे सांगत पाणी कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती; परंतु निसर्गाची किमया न्यारी. पावसाने नियमितता कायम ठेवलेली आहे.

कोट

पावसाने अपेक्षित हजेरी लावल्याने रोवणी करायला मोठी मदत झाली. मजुरांकरिता धावपळ करण्याची वेळ आली नाही. कमी खर्चात व्यवस्थित रोवणी पूर्ण करायला मोठी मदत झाली. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने बागायतीलासुद्धा मदत होत आहे. कारली पीक जोमात असून, भाव ५० रुपयांच्या पुढे आहे. वांगी लागवड केली आहे.

टिकाराम भुसारी, प्रगतिशील शेतकरी, पालांदूर

कोट

रोवणी तंत्रशुद्ध पद्धतीने करावी. पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. खताच्या मात्रा शिफारशीनुसार द्याव्या. अधिकचा खर्च टाळावा.

गणपती पांडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.

Web Title: Heavy rain accompanied Rovani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.