दमदार पावसाने पेरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:41 PM2019-07-01T23:41:08+5:302019-07-01T23:41:20+5:30

तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने जिल्हयात सर्वदूर हजेरी लावली. पावसाच्या आगमनानंतर खरीप हंगामांतर्गत कामाला वेगाने सुरुवात झाली असून पेरणीची कामे जोमात सुरु आहेत.

Heavy rains give rise to sowing | दमदार पावसाने पेरणीला वेग

दमदार पावसाने पेरणीला वेग

Next
ठळक मुद्देखरीप हंगाम : तलाव, बोड्यांमध्ये साचले पाणी, धरणातील उपयुक्त जलसाठा मात्र निरंक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने जिल्हयात सर्वदूर हजेरी लावली. पावसाच्या आगमनानंतर खरीप हंगामांतर्गत कामाला वेगाने सुरुवात झाली असून पेरणीची कामे जोमात सुरु आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध होत्या अशा शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. रोवणीसाठी पऱ्हे तयार झाले असतानांही पावसाचे आगमन न झाल्याने अशा शेतकऱ्यांचे टेंशन वाढले होते. अशातच जिल्हाभर पावसाच्या हजेरीने मशागतीच्या कामांना अंतीम रुप देवून पेरणीची कामे सुरु करण्यात आली. तर दुसरीकडे रोवणीयोग्य पऱ्हेहे व समाधानकारक पाऊस बरसल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चिखलणीची कामेही सुरु केली आहे.
जिल्ह्यात १ लक्ष ९२ हजार हेक्टर क्षेत्रात भात पीक लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र मृग व रोहिणी नक्षत्रात पाऊस न बरसल्याने पेरणीच्या कामाला प्रारंभ होऊ शकला नाही. आद्रा नक्षत्राच्या सहाव्या दिवशी पाऊस बरसल्याने मशागतीच्या कामांना अंतीम रुप देण्यात आले.
दरम्यान जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर, भंडारा, साकोली, मोहाडी, तुमसर व लाखनी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. विशेषत: मागील तीन दिवसात पावसाच्या हजेरीमुळे खरीपाच्या कामाला जोर आला आहे. शेतकरी कृषी केंद्रात साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे.
सरासरी ४५ मिमी पाऊस
जिल्ह्यात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. यात सरासरी ४५.१ मिमी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. यात भंडारा व साकोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. भंडारात ६६.५ मिमी तर साकोली तालुक्यात ७२.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. लाखनीत ३२, मोहाडी ४०.३, तुमसर ४६.१ तर लाखांदूरात ४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Web Title: Heavy rains give rise to sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.