राज्यपालांच्या दौऱ्यासाठी शहरातील महामार्गावरील अवजड वाहतूक राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 01:02 PM2024-09-30T13:02:37+5:302024-09-30T13:03:48+5:30
Bhandara : सकाळी ७ वाजल्यापासून २ पर्यंत वाहतुकीवर राहणार निर्बंध
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सोमवारी (दि. ३०) भंडारा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जड, अवजड वाहनांची वाहतूक वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत.
राज्यापालांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी अवजड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. भंडारा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५३ हा मुजबी ते कारधापर्यंत दुपदरी असून, या मार्गावरून दुचाकी तसेच ऑटो, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. राज्यपालांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी मार्गात हा बदल करण्यात आला आहे. ही अधिसूचना ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपावेतो अंमलात राहणार आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर
महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे भंडारा विश्रामगृ- हावर सकाळी १० वाजता आगमन होत आहे. त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस विभाग अलर्ट मोडवर आले आहे.
असा आहे बदल
नागपूरकडून तिरोडा-गोंदियाकडे जाणारी वाहतूक नागपूर रामटेक कांदी-जांब-खापा-देव्हाडा- तेथून पुढे तिरोडा-गोंदिया मार्गे पुढे जाईल.
गोंदिया-तिरोडा अदानी प्लॅट, तुमसरकडून भंडारा नागपूरकडे जाणारी वाहतूक खापा चौकातून जांब-कांदी रामटेक मार्गे नागपूरकडे वळविण्यात येईल.
साकोली, लाखनीकडून भंडारा-नागपूरकडे जाणारी वाहतूक लाखनी-के- सलवाडा अड्याळ-पवनी मार्गे-भिवापूर-उमरेड-नागपूरकडे वळविली जातील.
नागपूरकडून देवरीकडे जाणारी वाहतूक नागपूर, शहापूर, सातोना वरठी- मोहाडी-तुमसर-गोंदिया मार्गे सुरू राहील.