लाखांदूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:43 AM2019-05-20T00:43:04+5:302019-05-20T00:44:14+5:30
तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे.
दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे. प्रशासन मात्र पाणी टंचाई समस्येकडे दुर्लक्ष करीत असून बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरी आटल्या, बोअरवेल निकामी झाले. पाण्यासाठी दुसरे कोणते स्त्रोत उपलब्ध नाही. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात अतिरिक्त विहिरी व बोअर अधिग्रहण करण्याची गरज आहे.एप्रिल महिना संपला आहे व मे महिन्याच्या सुरुवात होऊन पंधरा दिवस झाले आहेत. पाणी टंचाईग्रस्त गावात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यासाठी लोकांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. परंतु प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. प्रशासन असेच बघत राहणार की काही उपाययोजना करेल, असे प्रश्न नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात उपस्थित केल्या जात आहेत.
पाण्याचा अपव्यय टाळा
भंडारा : जिल्ह्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नसावी, असे वाटत असले तरी पाणी टंचाईची झळ पोहोचते. निसर्गाने भरभरुन दिलेल्या भंडारा शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात जाणवत असले तरी भविष्यात येथील नागरिकाना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचा पुर्नवापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची हीच वेळ आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुर्नवापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा शहरासह जिल्हाभरात पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात काही भागात पाणी येत नाही तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरडतात. ग्रामीण भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाºयाने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे मोठे आव्हान आहे.