हेल्मेट सक्तीची भंडाऱ्यात धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:19 PM2018-12-02T22:19:47+5:302018-12-02T22:20:23+5:30

जिल्ह्यात हेल्मेट सक्तीनंतर पोलिसांच्या कारवाईचा नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली असून शहरातील सर्वच रस्त्यांवर रविवारी हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवितांना नागरिक दिसत होते. तर हेल्मेट खरेदीसाठी रस्त्यांवरील दुकानामध्ये नागरिक गर्दी करुन होते. ५०० रुपये दंड भरण्यापेक्षा हेल्मेट विकत घेणे परवडले, असे नागरिक सांगत होते. संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचीच चर्चा असून पोलीसही विना हेल्मेट दुचाकी चालकांच्या मागावर आहेत.

Helmet exposed in forced reserves | हेल्मेट सक्तीची भंडाऱ्यात धास्ती

हेल्मेट सक्तीची भंडाऱ्यात धास्ती

Next
ठळक मुद्देकारवाईचा बडगा : हेल्मेट खरेदीसाठी रस्त्यांवरील दुकानात दिवसभर गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात हेल्मेट सक्तीनंतर पोलिसांच्या कारवाईचा नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली असून शहरातील सर्वच रस्त्यांवर रविवारी हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवितांना नागरिक दिसत होते. तर हेल्मेट खरेदीसाठी रस्त्यांवरील दुकानामध्ये नागरिक गर्दी करुन होते. ५०० रुपये दंड भरण्यापेक्षा हेल्मेट विकत घेणे परवडले, असे नागरिक सांगत होते. संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचीच चर्चा असून पोलीसही विना हेल्मेट दुचाकी चालकांच्या मागावर आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सक्ती करण्यात आली. पोलीस आणि परिवहन विभागाच्यावतीने मोहीम राबवून विना हेल्मेट वाहन चालविणाºया दुचाकी चालकावर कारवाईचा धडाका सुरु केला पहिल्याच दिवशी ३६५ जणांवर दंडात्मक कारवाई करुन १ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसुल केला. चौकाचौकात पोलीस वाहनांची तपासणी करीत असल्याचे शनिवारी दिसून आले. त्यामुळे रविवारी बहुतांश दुचाकी चालकांनी हेल्मेट घालणेच पसंत केले. शहरातील विविध परिसरात हेल्मेटधारी दुचाकीस्वार दिसत होते. तर हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांच्या मनात पोलिसांची धास्ती होती. चौकात पोलीस अडवेल आणि दंड ठोकेल या भितीतून अनेकजण आड रस्त्यांचा वापर करीत असल्याचेही रविवारी दिसून आले.
आता हेल्मेट सक्तीतून आपली सुटका नाही. त्यामुळे अनेकांनी अडगळीत टाकलेले हेल्मेट बाहेर काढले. तर ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांनी हेल्मेट खरेदीसाठी दुकानाकडे धाव घेतली. या हेल्मेट सक्तीचा फायदा व्यवसायीकांना चांगलाच होत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर ठिकठिकाणी हेल्मेट विक्रीची दुकान लागले आहेत. ३०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत हेल्मेट विकले जात आहे. याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती. अशी स्थिती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दिसत आहे. प्रत्येकजण हेल्मेट घालूनच बाहेर निघत असल्याचे चित्र आहे. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट आवश्यक असून नागरिक आता सक्तीमुळे का होईना त्याचा वापर करीत आहे. हेल्मेट सक्तीमुळे नागरिकांत चांगलीच धास्ती असून मोहीमही प्रभावीपणे सुरु आहे.
हेल्मेट आयएसआय हवे
हेल्मेट आयएसआय असनेच आवश्यक आहे. आयएसआय हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर पोलीस कारवाई करु शकतात. शहरातील बहुतांश रस्त्यांवर विकले जाणारे हेल्मेट हे तकलादु आणि आयएसआय मार्क नसलेले आहे. अनेक हेल्मेटवर आयएसआय लिहलेले असले तरी त्याची सत्यता तपासण्याचीही गरज आहे. निकृष्ठ दर्जाचे हेल्मेट एखाद्यावेळेस अपघातास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे नागरिकांनी उच्च प्रतीचे आणि आयएसआय मार्क असलेलेच खरेदी करण्याची गरज आहे.
दुसऱ्या दिवशी १५५ जणांवर कारवाई
पोलीस खात्याच्या वतीने जिल्हाभरात हेल्मेट सक्तीची मोहीम राबविण्यात आली. दुसºया दिवशी १५५ जणांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला. शहरातील विविध मार्गांवर आणि ग्रामीण भागातही पोलिसांनी रविवारी प्रभावीपणे ही मोहीम राबविली.

Web Title: Helmet exposed in forced reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.