लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:46 AM2018-02-02T00:46:30+5:302018-02-02T00:47:46+5:30

बुद्धत्वामध्ये अनंत गुण समाविष्ट आहेत, त्याच्यात सर्वोच्च शुद्धता आहे, त्याच्या हृदयात सर्व प्राणीमात्रांच्या प्रती असीम करुणा आहे, आणि या करुणेनेच तो प्रबुद्ध मानव जे काही बोलतो त्याला धम्म असे म्हणतात, लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य आहे,...

To help in the development of people is the duty of Dhamma | लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य

लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य

Next
ठळक मुद्देसामाजिक न्याय मंत्र्यांचे प्रतिपादन : बोधिचेतिय विहारात धम्ममेघा धम्मसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बुद्धत्वामध्ये अनंत गुण समाविष्ट आहेत, त्याच्यात सर्वोच्च शुद्धता आहे, त्याच्या हृदयात सर्व प्राणीमात्रांच्या प्रती असीम करुणा आहे, आणि या करुणेनेच तो प्रबुद्ध मानव जे काही बोलतो त्याला धम्म असे म्हणतात, लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
बोधीचेतिय संस्था चिखली (हमेशा), एमआयडीसी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसर तसेच खुटसावरी मार्ग स्थित पर्यावरणस्थळी धम्ममेघा धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त अम्रपाली बुद्ध भीम मित्र मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. तत्पुर्वी पहिल्या सत्रात पंचशील ध्वजारोहण सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विठ्ठलराव घोगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये, राजु वहाने, केशव रामटेके आदी उपस्थित होते. त्यानंतर खुटसावरी फाटा ते बुद्ध विहारापर्यंत धम्म रॅली काढण्यात आली.
दुसºया सत्रात डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो भदंत सुगत, श्रामणेर प्रज्ञारत्न, श्रामणेरी संघशिला, अमृत बंसोड, वासंती सरदार, मन्साराम दहिवले, अ‍ॅड. एकनाथ रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत समता सैनिक महिला भीम गायन मंडळ कोसमतोंडी यांचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात विविध प्रकारचे गीत गायन व नृत्य करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो यांनी केले. यावेळी अ‍ॅड. एकनाथ रामटेके यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञावर भास्य केले. आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यांनी बोधीचेतीय विहाराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
तिसºया सत्रात आयोजित बुद्धभीम नृत्य कार्यक्रमाचे संचालन निकेत हुमणे यांनी केले. यावेळी दानदात्यांचा गौरचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी मानले. कार्यक्रमासाठी अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, मुकेश करवाडे, श्रावण कापगते, ईश्वर शेंडे, निर्धन कडव, सुजित बडवाईक, केशव वालोदे, संदीप मेश्राम, अशोक उईके, अशोक बोरकर, मोहन रामटेके, सुद्धोधन वालकर, सुखदास गणवीर, पी.जी. वैद्य, अतुल टेंभुर्णे, मधुसुदन चवळे, गंगाधर वासनिक, ब्रिजलाल ठवरे, अमरदीप बोपकर, अनाथपाल वैद्य, प्रेमदास लोणारे, धनंजय रामटेके, विनोद बोरकर, धमेंद्र बडोले, रामकृष्ण कांबळे, डॉ. नरेश आकरे, दिनेश रामटेके, मधुकर मेश्राम, ईश्वर बन्सोड, सुषमा भाऊराव वासनिक, चांगुळा कांबळे, अर्चना खोब्रागडे, रत्नमाला वासनिक, सुनंदा वासनिक, रचना वैद्य, शिला साखरे, द्वारका कानेकर, यशोधरा खोब्रागडे, लता उके, ज्योती मेश्राम, कुंदा बारसागडे, रेशमा बोरकर, फुलन गोंडान्ने, लता मेश्राम, प्रगती मगर, देवांगना फुले, निर्मला सुखदेव, रेशमा रामटेके, सीमा हरडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: To help in the development of people is the duty of Dhamma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.