शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे मदत द्या
By admin | Published: April 9, 2017 12:25 AM2017-04-09T00:25:38+5:302017-04-09T00:25:38+5:30
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, बावनथडी या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावा,...
परिणय फुके : अधिवेशनात मांडला शेतकऱ्यांचा प्रश्न
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, बावनथडी या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावा, अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ.परिणय फुके यांनी विधान परिषदेत शुक्रवारला तारांकित प्रश्नोत्तरात सभागृहात केली.
निवडून आल्यानंतर त्यांचे विधान परिषदेतील हे पहिले अधिवेशन आहे. यावेळी आमदार फुके यांनी महसुल मंत्र्यांना प्रकल्पांकरीता संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. १ जानेवारी रोजी मुुल्यांकन तिथी ग्राह्य धरण्यासाठी सांगूनही राज्य शासनाने अजूनही केंद्र शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी केली नाही. राज्य शासनाने संपादित जमिनीकरीता १८९४ च्या कलम ४ नुसार बाजारभाव निश्चित करीत असल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नावर महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणने खरे असल्याचे सांगितले.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास राज्य शासनाने चौकशी केली का? चौकशीच्या अनुषंगाने १ जानोरी २०१४ रोजीचे नवीन मुल्यांकन तिथी लागू करून नुकसान झालेल्या प्रकल्पस्त शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे फरकाची रक्कम देण्याबाबत कोणती कार्यवाही केली का? कार्यवाही न झाल्यास विलंबाची कोणती कारणे या आ.फुके यांच्या प्रश्नावर ना.चंद्रकांत पाटील म्हणाले, याप्रकरणी केंद्र शासनाने २६ नोव्हेंबर २०१५ च्या पत्रान्वये भूसंपादन अधिनियम, १८९४ नुसार कार्यवाहीस असलेल्या प्रकरणाबाबत केंद्र शासनाच्या अभिप्रायामध्ये विसंगती दिसून आली होती. त्यामुळे केंद्र शासनाकडे २७ एप्रिलच्या पत्रान्वये फेरमार्गदर्शन मागविले असल्याचे सांगितले. त्यानुसार केंद्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे माहितीसह संदर्भ करण्यात येत असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)