पोलिसांच्या मदतीने चिमुकलीला मिळाली आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:00 AM2020-10-10T05:00:00+5:302020-10-10T05:00:28+5:30

सद्रक्षणाय-खलनिग्रणाय हे ब्रीद असलेल्या पोलीस खात्यावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते. ही जवाबदारी योग्यरित्या सांभाळत असले तरी अनेकदा त्यांच्यावर टिकेची झोळ उठविली जाते. मात्र पोलिसही एक माणूसच आहे. त्यांचीही एक सामाजिक बांधिलकी आहे. याच सामाजिक बांधिलकीतून एका हरविलेल्या तीन वर्षीय चिमुकलीची आणि आईची भेट घडवून आणली. तुमसर शहर पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माणुसकीच्या या प्रत्ययाने सर्वांनी त्यांना शॉल्यूट केला.

With the help of the police, Chimukali got his mother | पोलिसांच्या मदतीने चिमुकलीला मिळाली आई

पोलिसांच्या मदतीने चिमुकलीला मिळाली आई

Next
ठळक मुद्देतुमसरची घटना : पोलिसांनी दिला माणुसकीचा परिचय, गल्लीबोळात फिरून ध्वनीक्षेपकावरून सूचना

राहूल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सद्रक्षणाय-खलनिग्रणाय हे ब्रीद असलेल्या पोलीस खात्यावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते. ही जवाबदारी योग्यरित्या सांभाळत असले तरी अनेकदा त्यांच्यावर टिकेची झोळ उठविली जाते. मात्र पोलिसही एक माणूसच आहे. त्यांचीही एक सामाजिक बांधिलकी आहे. याच सामाजिक बांधिलकीतून एका हरविलेल्या तीन वर्षीय चिमुकलीची आणि आईची भेट घडवून आणली. तुमसर शहर पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माणुसकीच्या या प्रत्ययाने सर्वांनी त्यांना शॉल्यूट केला.
तुमसर शहरातील गांधीनगर नेहरू शाळेच्या पटांगणामागे गुरूवारी सकाळी ९ वाजता एक तीन वर्षीय बालिका रडत होती. येथून जाणाऱ्या अनेकांनी सुरूवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तासभर लोटूनही तिचे रडने थांबत नव्हते. म्हणून काही सुज्ञ नागरिकांनी तिची चौकशी केली. परंतु तिला काहीच सांगता येत नव्हते. मुलगी कुणाची येथे कशी आली असेल, असा विचार येथे उपस्थितांनी सुरू केला. त्यावेळी कुणीतरी पोलीस ठाण्यात माहिती देण्यास सांगितले. त्यावरून तुमसर पोलीस ठाण्यात त्या चिमुकलीला आणण्यात आले. मात्र या चिमुकलीची ओळखच पटत नव्हती. ती काही बोलतही नव्हती. शेवटी ठाणेदार रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार मनोहर शहारे, श्वाती गभने, शेंडे व रोडगे यांनी या मुलीच्या आईचा शोध घेणे सुरू केले. तुमसर शहरातील गल्लीबोळात शोध सुरू झाला. पोलीस वाहनावरील ध्वनीक्षेपकावरून मुलगी हरविल्याची माहिती देणे सुरू केले. एवढेच नाही तर चिमुकलीच्या फोटोचे पत्रक तयार करून शहरातील विविध भागात वितरित करण्यात आले. एका चिमुकलीला घेवून पोलीस आईचा शोध घेत होते.
अखेर दुपारच्या सुमारास यश आले. नितीन मेश्राम यांची देवांशी कन्या असून ती कुंभारे नगरात राहत असल्याचे पुढे आले. पोलिसांनी थेट कुंभारेनगर गाठून तिला आई पूजाच्या हवाली केले. आईला पाहताच चिमुकली वेगाने तिच्याकडे झेपावली. पोलिसांनी तब्बल तीन साडेतीन तास चालविलेल्या शोध मोहीमेचे सार्थक झाले. आईच्या डोळ्यातून अश्रूधारा लागल्या. हा हृदयपर्शी प्रसंग पाहून पोलिसांच्या डोळ्याच्या कडाही ओलावल्या.

पोलिसांची मानले आभार
इकडे पूजा मेश्रामही आपली मुलगी दिसत नाही म्हणून शोध घेत होती. घरासमोर खेळता खेळता ती अचानक भरकटली आणि घराचा रस्ता विसरली. काही सहृदयी व्यक्तींच्या हा प्रकार लक्षात आल्याने ती पोलीस ठाण्यात पोहचली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. आईने मुलीला आपल्या कडेवर घेत डबडबत्या डोळ्यांनी पोलिसांचे आभार मानले.
 

Web Title: With the help of the police, Chimukali got his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस