जिल्ह्यातील महामार्ग विस्तारीकरणाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:53 AM2021-02-23T04:53:05+5:302021-02-23T04:53:05+5:30

भंडारा : अवधीपूर्वी बांधकाम न झालेल्या महामार्ग विस्तारीकरणाचे घोडे अद्यापही रखडले आहेत. त्यातच कोरोनाचा फटका या महामार्ग बांधकामाला अजूनच ...

Highway expansion work in the district stalled | जिल्ह्यातील महामार्ग विस्तारीकरणाचे काम रखडले

जिल्ह्यातील महामार्ग विस्तारीकरणाचे काम रखडले

Next

भंडारा : अवधीपूर्वी बांधकाम न झालेल्या महामार्ग विस्तारीकरणाचे घोडे अद्यापही रखडले आहेत. त्यातच कोरोनाचा फटका या महामार्ग बांधकामाला अजूनच विलंब लावीत आहेत. या रखडलेल्या कामांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम जाणवत आहे.

भंडारा जिल्हयातील कारधा ते निलज मार्ग, तुमसर ते साकोली मार्ग व भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे प्रस्तावित आहे तर कुठे बांधकाम थंडबस्त्यात आहे. भंडारा ते तुमसर या राज्यमार्गाच्या (नवीननुसार महामार्ग) विस्तारीकरणाचे घोडे तांत्रिक बाबींमुळे रखडले आहे. भंडारा ते मोहाडी पर्यंतच्या रस्त्यावर असंख्य लहानमोठ्या खड्ड्यांनी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. साकोली ते तुमसर या दोन तालुक्यांना जोडणारा तुमसर ते साकोली महामार्ग विस्तारीकरणाचे पुढेही असेच घडले. कुठे तांत्रिक तर कुठे निधीचा वानवा जाणवत आहे.

बॉक्स

नागरिकांचा जीव धोक्यात

दुसरीकडे निलज ते कारजा या महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम गत दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे, दुसरीकडे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्री-बेरात्री होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. दुसरीकडे समृद्धी महामार्ग विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या तुमसर तालुक्यातील महामार्गाचे काम काही ठिकाणी पूर्णत्वास येत असले तरी उड्डाणपुलांचे काम अजूनही सुरूच आहे.

Web Title: Highway expansion work in the district stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.