लाखनी येथे महामार्ग पोलिसांतर्फे चालकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:12+5:302021-09-22T04:39:12+5:30
यावेळी अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, पोलीस उपअधीक्षक संजय पांडे, पोलीस निरीक्षक वैशाली वैरागडे यांच्या ...
यावेळी अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, पोलीस उपअधीक्षक संजय पांडे, पोलीस निरीक्षक वैशाली वैरागडे यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महामार्ग पोलीस मदत केंद्र गडेगाव (लाखनी) जिल्हा भंडारामार्फत चालक दिनाचे औचित्य साधून लाखनी बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग, अशोक टोल प्लाझा सेंदूरवाफा (साकोली) , अभिजित टोल प्लाझा कारधा (भंडारा) आणि महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव (लाखनी) येथे वाहनचालक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बसचालक, रुग्णवाहिकाचालक, ट्रॅकचालक याशिवाय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांचा पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करून वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी टोल मॅनेजर रॉय व सहकारी, संघर्ष वाहनचालक संघटना उपप्रमुख दत्ता मेश्राम, उपविभागीय अभियंता जगताप, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, टोल प्लाझा व्यवस्थापक कुमार जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ता पवन मस्के, ऑल इंडिया पँथर सामाजिक संघटनेचे महासचिव बिरबल हलमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे वाहनचालकांना आवाहन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे, नितीन आगासे यांच्यासह महामार्ग पोलीस मदत केंद्रातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
210921\img-20210917-wa0157.jpg
photo