विदर्भात भाज्यांचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:35 PM2020-03-27T13:35:35+5:302020-03-27T13:35:59+5:30
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाल्याने विदर्भातील सगळ््याच शहरात लसूण, कांदे व बटाट्यासह भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/ गडचिरोली : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाल्याने विदर्भातील सगळ््याच शहरात लसूण, कांदे व बटाट्यासह भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. सध्या बटाटे ३० रुपये किलो तर कांदे ६0 रुपये किलो दराने विकले जात आहे. गेल्या आठवड्यात ही किंमत अनुक्रमे २५ व ४० अशी होती. गत दोन दिवसात अद्रक आणि लसूणाचे भाव वाढले आहे. शंभर रुपये किलोचा लसूण १४०रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ६० ते ७० रु. किलो या भावाने मिळणारी गावराणी कोथिंबीर आता थेट १६० रु. किलोवर गेली आहे. कोबी, वांगे, भेंडी, चवळी व इतर भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. येत्या तीन-चार दिवसात भाजीबाजार बंद राहणार असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते आहे.