हिरकणी कक्ष ठरतोय कुचकामी

By admin | Published: December 30, 2014 11:27 PM2014-12-30T23:27:32+5:302014-12-30T23:27:32+5:30

बसस्थानकावर बाळांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते, ही बाब हेरून राज्य शासनाने बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या स्तनपानासाठी

The Hirkani Room is inconvenient | हिरकणी कक्ष ठरतोय कुचकामी

हिरकणी कक्ष ठरतोय कुचकामी

Next

भंडारा : बसस्थानकावर बाळांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते, ही बाब हेरून राज्य शासनाने बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या स्तनपानासाठी सुविधा करून देण्यात आलेली आहे. परंतु बसस्थानकावर असे कक्ष आहे, याची जनजागृती न झाल्यामुळे महिला प्लॉटफार्मवरच स्तनपान करीत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.
भंडारासह जिल्ह्यातील विविध बसस्थानकावर महिला, पुरूष प्रवाशांची दिवसभर गर्दी असते. अशावेळी चिमुकल्यांना स्तनपान करताना महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.
भूक लागताच ही चिमुरडी रडायला लागतात, यामुळे नाईलाजाने का होईना सर्वांच्या नजरा वाचिवत महिलांना पदराआड मुलांना स्तनपान करावे लागते. अशावेळी चोरट्या जनरेने त्यांच्याकडे पाहणारेही महाभाग असतात. ही बाब हेरून राज्य शासनाने हिरकणी कक्षची स्थापना केली. कक्ष तयार करताना मात्र त्याबाबत जनजागृती करण्याचा विसर एसटी महामंडळाला पडल्याचे दिसून येत आहे. बसथानकावर ही सुविधा असताना म२िहला उघड्यावर स्तनपान करताना दिसून येतात. भंडारा बसस्थानकावर फेरफटका मारला असता प्रवाशांना बसण्याकरिता असलेल्या बाकांवर महिला मुलांना स्तनपान करीत असल्याचे आढळून आले. त्यांना हिरकणी कक्षात मुलांना स्तनपान करण्याची सोय आहे, तिथे का जात नाही, असे विचारले असता हिरकणी कक्ष म्हणजे काय? हेच बहुतेक महिलांना माहिती नसल्याचे समोर आले. शासनाने मातांकरिता हिरकणी कक्षाची निर्मिती केली. परंतु त्यासंदर्भात जनजागृती नसल्याने महिलांना त्याचा उपयोग करीत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे बसस्थानकावर या कक्षाची माहिती होण्याकरिता ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The Hirkani Room is inconvenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.