सोरणा येथे इसमाचा खून

By admin | Published: May 26, 2015 12:33 AM2015-05-26T00:33:18+5:302015-05-26T00:33:18+5:30

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या आरोपावरुन एका इसमाने दोन मित्रांच्या सोबतीने इसमाची तलवारीने वार

His blood in Sorana | सोरणा येथे इसमाचा खून

सोरणा येथे इसमाचा खून

Next

तीन आरोपींना अटक : पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नहरात फेकला
आंधळगाव : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या आरोपावरुन एका इसमाने दोन मित्रांच्या सोबतीने इसमाची तलवारीने वार करुन खून केल्याचा प्रकार सोमवारला उघडकीस आला. ही घटना पांगडी जंगलात बावनथडी ते अंबागड नहरात रविवारला घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मत्सा सकरु राठोड (५५) रा. सोरणा असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी देवराम राजाराम धुर्वे (३५) रा.सोरणा, दिनेश नारायण कोडवते (२३) रा.पांगडी, शिशुपाल दयाराम पुसाम (२५) रा.लंजेरा या तीन आरोपींना अटक केली आहे. मोहाडी तालुक्यातील सोरणा येथील मत्सा राठोड याला गुप्तधन शोधण्याचा छंद होता. त्यातच त्याची देवराम धुर्वे याच्याशी ओळख झाली होती. देवरामची पत्नी पायाळू असल्यामुळे या तिघानी मिळून गुप्तधन शोधण्याचा बेत आखला. दरम्यान, देवरामची पत्नी व मत्सा यांच्यात जवळीकता निर्माण झाल्याचा संशय देवरामला आला. त्यानंतर त्याने मत्साचा काटा काढण्याचा बेत आखला. ही बाब देवरामच्या पत्नीने मत्सा राठोडला सांगितली. त्यानंतर अडथळा दूर करण्यासाठी देवरामला मारण्याचा बेत आखला. दरम्यान, मत्सा हा १९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पांगळी येथे जावून येतो, असे सांगून घरुन निघाला. मात्र रात्र होऊनही तो घरी न परतल्याने मत्साचा मुलगा जयकिशोर राठोड याने आंधळगाव पोलिसात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन त्यांनी देवरामला ताब्यात घेऊन पोलीसी हिसका दाखविताच त्याने मत्सा व आपल्या पत्नीचे संबंध असल्यामुळे तलवारीने गळा चिरुन खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी यात कोण कोण सहभागी होते. कुठे खून केला याबाबत शोध घेतला असता, देवरामने मत्साच्या मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी चेहरा दगडाने ठेचून विद्रुप करुन मृतदेह बावनथडी नहरात फेकल्याचे सांगितले. यासाठी दिनेश कोडवते, शिशुपाल पुसाम या मित्रांची मदत घेतल्याचे बयानात सांगितले.
त्यानंतर तिघांविरूद्ध भादंवि ३०२ (खून करणे), २०१ (पुरावा नष्ट करणे), १२० (ब) ३४ कलमान्वये गुन्हे नोंदवून अटक केली. या घटनेचा तपास तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनात आंधळगावचे ठाणेदार मनोज काळबांधे, हवालदार सोळंकी, साकुरे, सिंगाडे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: His blood in Sorana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.