ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:24 AM2019-09-02T00:24:06+5:302019-09-02T00:24:46+5:30
परसोडीवासीयांनी जपलेले १६१ वर्षांची परंपरा पाहण्यासाठी गावात एकच गर्दी झाली होती. पोळ्याचे आयोजन गावची पंचकमेटी, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. बालगोपालांपासून तर वयोवृद्धांची गर्दी होती. महाराष्ट्रीयन वेषभूषेत लहानापासून थोरापर्यंत डोक्यात पांढरी टोपी व अंगात पांढरा धोतर शर्ट व महिलांनी नाकात पुणेशाही नथ व अंगात काठाचे लुगडे, पैठणी घातलेली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : परसोडी (जवाहरनगर) येथे १८५८ पासून ऐतिहासिक पोळा भरतो. तीच परंपरा जपत यावर्षीही ३७ बैलजोडी व १२०० लाकडी नंदी बैल पोळ्यात हजेरी लावली. यावेळी सहभागी उत्कृष्ट बैल सजावटीचे पारितोषिक बैलजोडी मालकांना देण्यात आले.
परसोडीवासीयांनी जपलेले १६१ वर्षांची परंपरा पाहण्यासाठी गावात एकच गर्दी झाली होती. पोळ्याचे आयोजन गावची पंचकमेटी, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. बालगोपालांपासून तर वयोवृद्धांची गर्दी होती. महाराष्ट्रीयन वेषभूषेत लहानापासून थोरापर्यंत डोक्यात पांढरी टोपी व अंगात पांढरा धोतर शर्ट व महिलांनी नाकात पुणेशाही नथ व अंगात काठाचे लुगडे, पैठणी घातलेली होती. यावर्षी ३७ बैल कास्तकारांनी आपापले बैल सजावट करून सायंकाळी आंब्याच्या तोरणात बैलजोडीची हजेरी लावली. मंचावरून झडत्यांचा पाऊस पडत होता.
मारसील दहाचा उका सांगून देरे बैलबत्तीच्या झाडा, एक नमन कवडा पारबती हरबोला हर हर महादेवचा गजर करीत यावेळी पोळा पाहायला येणाऱ्यांची संख्या वाढत होती. यामध्ये मंसाराम वंजारी, किशन वंजारी, खुशाल फंदे, राजकपूर राऊत, मोतीलाल येळणे, बाल शेतकरी प्रियांशू थोटे यांचा समावेश होता. बैलांच्या पोळ्यात अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पोलीस पाटील दौलत वंजारी, प्रगतशील शेतकरी धनविजय वंजारी, कल्पना मोटघरे, उपसरपंच नाना हटवार व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोळा पंचकमेटी अध्यक्ष मारोतराव हटवार व सर्व सदस्य उपस्थित होते. दुसºया दिवशी म्हणजे मखराचा पोळा आयोजित करण्यात आले. दुपारी महिलांचे स्पर्धा झाली. यात बटाटा अडथळा, कबड्डी, हंडी फोड, घागर दौड, रुमाल बांधणी स्पर्धा घेण्यात आले. सायंकाळी पाच वाजता आंब्याच्या तोरणात बाल शेतकऱ्यांनी आपली लाकडी नंदीबैल सजावट करून हजेरी लावली. बालकास्तकाराने जागाच अपुरी पडली. येथे विक्रमी सहा इंच पासून तीस फुटापर्यंत १२०० लाकडी नंदीबैल होते. विशेषत: आयुध निर्माणीचे लेफ्टनंट कर्नल व पोलीस ठाणे जवाहरनगरचे ठाणेदार येंचे बाल कास्तकार नंदीबैलासोबत हजर होते. उतकृष्ट सजावटीसाठी पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी लेफ्टनंट कर्नल अभिजीत वैद्य, जवाहरनगरचे ठाणेदार सुभाष बारसे, माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, यशवंत वंजारी, कौशल्या हटवार, शामकला चकोले, कुंदा हटवार उपस्थित होते. संचालन पोलीस पाटील दौतल वंजारी, मोतीलाल येळणे यांनी केले. आभार राजकपूर राऊत यांनी मानले.
यशस्वितेसाठी पंचकमेटी अध्यक्ष मारोतराव हटवार, राजकपूर राऊत, रघुपती फंदे, सुनील सेलोकर, मोहन डोरले, धनराज रुखे, भाऊराव वैरागडे, मोतीलाल येळणे, शाम महाजन, कशिनाथ वंजारी, प्रेमसागर वैरागडे, उदाराम हटवार, दामोधर वंजारी, दर्शन फंदे, प्रकाश वंजारी, लिलाधर चोपकर, नारायण पडोळे, देवचंद सेलोकर यांनी सहकार्य केले.