ऐतिहासिक सिध्दार्थ वसतिगृहाला आग
By Admin | Published: May 25, 2016 01:14 AM2016-05-25T01:14:57+5:302016-05-25T01:14:57+5:30
दीडशे वर्षापूर्वीची कौलारु इमारत दूपारी ४.१५ वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीत जळुन खाक झाली.
दीडशे वर्षांची इमारत : ५० लाखांचे नुकसान, नगरपालिकेचे अग्निशमन वाहन कुचकामी, नागरिकांनी दाखविली समयसुचकता
पवनी : दीडशे वर्षापूर्वीची कौलारु इमारत दूपारी ४.१५ वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीत जळुन खाक झाली. आग लागल्यानंतर नागरिकांनी समयसुचकता दाखवित आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत इमारत आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती.
नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे पर्यत्न करून नगर पालिका, पोलीस स्टेशन व भंडारा पोलीस मुख्यालयाला तातडीने कळविले. परंतु पाण्याचे टँकर पोहचण्यापूर्वी आधिकाधिक इमारत जळुन खाक झालेली होती. प्रशिक्षि२त वाहनचालकाची नियुक्ती न झाल्याने पालिकेचे अग्नीशमन वाहन पंधरा दिवसात दुसऱ्यांदा कूचकामी ठरले.२२
ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी स्वतंत्र्य संग्राम सैनिक दलीतमित्र मन्साराम राऊत यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात वसतीगृह सुरु केले. तीच इमारत आगीत जळून खाक झाली. इमारतीमध्ये भारत सेवक सिध्दार्थ वसतीगृह, श्री संताजी वसतीगृह व धम्मचक्र कन्या वसतीगृह या तिनही वसतीगृहाचे रेकार्ड, तिनही वसतीगृहासाठी विद्यार्थी-विद्याथींच्या गाद्या, ग्रंथालयाची पुस्तके, टीव्ही, दोन कॉम्प्युटर, इन्व्हर्टर, बॅटरी व अन्य महत्वाच्या वस्तू तसेच विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणारे लाकडी बेंच अशा सर्व वस्तू जळून खाक झाल्या. वसतीगृह संस्थेचे सचिव विकास राऊत हे कुटूंबासह भंडारा येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, धर्मेंद्र नंदरधने, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, मोहन पंचभाई, जिल्हा मत्स्य व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, राम भेंडारकर, पोलीस निरीक्षक खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गहादे व वॉर्डातील नागरिकांनी तात्काळ वसतीगृह परिसर गाठले. त्यांनी आगीवर नियंत्रणासाठी कसोसीने प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले. सायंकाळी ६ वाजता भंडारा येथून अग्नीशमन वाहन पोहचले व वसतीगृह इमारतीची आग विझविण्याचे प्रयत्न झाले. नगरपरिषद, दुग्ध उत्पादक संघ व भंडाराचे अग्नीशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. परंतु सागवनी लाकूड असलेली इमारत व सर्व साहित्य असे साधारणत: ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्नीशमन वाहनासाठी चालक व अन्य कर्मचारी नियुक्तीचे अधिकार न दिल्याने पंधरवाड्यात दोन घरे जळुन खाक झाली. (तालुकाा प्रतिनिधी)