जिल्हा रुग्णालयातील अनेक विभागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:39 AM2021-01-16T04:39:49+5:302021-01-16T04:39:49+5:30

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्निकांडात दहा चिमुकल्यांचा प्राण गेला. एसएनसीयू कक्षाला आग लागून हा कक्ष पूर्णत: बेचिराख झाला. याचा ...

Hit several departments in the district hospital | जिल्हा रुग्णालयातील अनेक विभागांना फटका

जिल्हा रुग्णालयातील अनेक विभागांना फटका

Next

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्निकांडात दहा चिमुकल्यांचा प्राण गेला. एसएनसीयू कक्षाला आग लागून हा कक्ष पूर्णत: बेचिराख झाला. याचा फटका लगतच्या इतर कक्षांनाही बसला आहे. या कक्षालगत असलेला डायलिसीस कक्ष दुसरीकडे हलविण्यात आला असून तो पूर्ववत करण्यासाठी वेळ लागत असल्याने आठ दिवसांपासून बंद आहे. एसएनसीयू कक्षाच्या समोरच आयसीयू कक्ष आहे. हाही कक्ष अग्निकांडापासून बंद आहे. त्यामुळे येथे अतिविशेष उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नागपूरला रेफर करण्याची वेळ आली आहे.

या दोन महत्त्वाच्या विभागासोबतच इतर विभागांचे कामकाजही प्रभावित झाले आहे. दररोज मंत्र्यांचे दौरे आणि चौकशीचा ससेमिरा यामुळे येथील डॉक्टर आणि परिचारिका तणावात दिसत आहेत. त्यांचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामकाजावर होताना दिसत आहे. आठ दिवस होत असले तरी आजही या अग्निकांडाची धग रुग्णालयात दिसून येत आहे. प्रसूतिपूर्व पक्षात कक्षासह इतर ठिकाणी योग्य उपचार होत नसल्याची ओरड रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करीत आहे. याबाबत कुणाकडे तक्रार केली तर कुणी ऐकूण घेण्याच्याही मनस्थितीत नसते.

बॉक्स

प्रफुल्ल पटेल यांना साकडे

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती पूर्ववत करण्यासाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना साकडे घातले आहे. आगीमुळे उध्वस्त झालेल्या एसएनसीयू कक्षासह इतर सुविधांसाठी शासनाकडून ताबडतोब निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांनी एका निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून रुग्णालय पूर्ववत करण्याची विनंती खासदार पटेल यांना करण्यात आली आहे.

Web Title: Hit several departments in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.