भंडारा पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:04 AM2019-08-29T00:04:14+5:302019-08-29T00:05:22+5:30

डिजीटल महाराष्ट्र संकल्पनेत महत्वाची भुमिका पार पाडणाºया राज्यातील हजारो संगणक परिचालकांकडे शासन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहेत. भंडारा तालुक्यात एकूण ९४ ग्रामपंचायतीचा समावेश असून ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि सुसूत्रतेने चालावा,

Holding of computer operators before the Bhandara Panchayat Committee | भंडारा पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांचे धरणे

भंडारा पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांचे धरणे

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना निवेदन : आयटी विभागात सामावून घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील सर्व संगणक परिचालकांना आयटी विभागात कायमस्वरुपी सामाऊन घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी भंडारा तालुक्यातील संगणक परिचालकांनी बुधवारी पंचायत समितीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
डिजीटल महाराष्ट्र संकल्पनेत महत्वाची भुमिका पार पाडणाºया राज्यातील हजारो संगणक परिचालकांकडे शासन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहेत. भंडारा तालुक्यात एकूण ९४ ग्रामपंचायतीचा समावेश असून ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि सुसूत्रतेने चालावा, यासाठी डिजीटल महाराष्ट्र संकल्पनेत महत्वाची भूमिका संगणक परिचालक गेल्या अनेक वर्षांपासून पार पाडत आहेत. प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्यात यावे, यासाठी बुधवारी पंचायत समिती कार्यालयासमोर संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिली असून त्याचा शासन निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागात नियुक्ती देण्यात यावी, १४ वित्त आयोगातून मानधन न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५ हजार रुपये देण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे मानधन देण्यात यावे, नोटीस न देता कामावरुन कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घेण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळाने खंडविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मात्र शासनाकडून तोडगा निघाला नाही. त्यामुळे परिचालकांमध्ये असंतोष पसरला असून कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
आंदोलनात परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक बांगडे, उपाध्यक्ष स्मिता उषेकवार, सचिव सचिन चामट, नवनित बेहरे, रुमदेव माकडे, अश्विन साखरे, सुनिल मेश्राम, विनोद पोटवार, राहुल साखरे, मोहन खंगार, अश्विनी चोपकर, माधुरी कुंभलकर, मनिषा साखरकर, शालिनी बोरकर, राजकुमार शेंडे यांच्या तालुक्यातील संगणक परिचालक सहभागी झाले होते.

Web Title: Holding of computer operators before the Bhandara Panchayat Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.