'त्या' शासन निर्णयाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:19 AM2017-12-05T00:19:28+5:302017-12-05T00:20:02+5:30
महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय जाहीर केला होता़
आॅनलाईन लोकमत
भंडारा : महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय जाहीर केला होता़ परंतु शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २४ नोव्हेंबर रोजी एक हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा शासन आदेश काढला. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ या आदेशाचा निषेध करून शासन आदेशाची होळी करण्यात आली़
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा कॉऊन्सिलची सभा राणाभवन, भंडारा येथे सविता लुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा कार्याध्यक्ष हिवराज उके उपस्थित होते. दिलीप उटाणे यांनी राज्य शासनाची भूमिका सांगितली. नुकत्याच झालेल्या दिल्ली मोर्च्याची माहिती रेखा टेंभूर्णे यांनी केली़ सभेत २०१७-१८ च्या संघटना सभासद नोंदणी बाबत चर्चा करण्यात आली़ संप काळात राज्य सरकार ने दिलेले आश्वासन पूर्ण करावे यासाठी दि़ १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर विशाल मोर्च्याचे आयोजन केले आहे़ त्यात भंडारा जिल्ह्यतील दोन हजार अंगणवाडी कर्मचाºयांनी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला़ संपकाळात महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय जाहीर केला होता़ मात्र केवळ एक हजार रुपये देण्याचे शासन आदेश काढल्याले संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय सचिव आयटक चे कॉ़डी़एच़सचदेवा तसेच मोहाडी तालुक्यातील ललिता शिंगाडे रोहणा, साकोली तालुक्यातील सुशिला धारणे, रेंगेपार कोहळी, कामगारांचे नेते सुकोमल सेन व जि़प़ कर्मचाºयांचे नेते कॉ़ योगीराज यांना श्रध्दांजली देण्यात आली़ सभेत अंगणवाडी युनियन मजबुत करण्याच्या दृष्टीने मोहाडी ७ जानेवारी, भंडारा शहर २७ जानेवारी, भंडारा ग्रामीण ३ फेब्रुवारी, लाखांदूर २८ जानेवारी, तुमसर ४ फेब्रुवारी, साकोली १० फेब्रुवारी, लाखनी ११ फेब्रुवारीला तालुका मेळावे घेण्याचा निर्णय करण्यात आला़ सभेला अल्का बोरकर, रिता लोखंडे, वंदना बघेले, कुंदा भदाडे, आशा रंगारी, प्रमीला बागडे, कांचन मेश्राम, रेखा टेंभूर्णे, किरण मस्के, मंगला शेंडे, शारदा आगासे, सुंनदा राऊत, निर्मला बांते, संजु लोंदासे, वैशाली भोंदे, छाया इलमे, ललिता वाहणे, जयश्री मेश्राम, शारदा गोटे, सरीता गजभिये, सुनंदा ठाकरे, उषा तिवारी, लक्ष्मी बावणे आदी उपस्थित होते.