आयसोलेशन वॉर्डातून २०३ व्यक्तींना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:00 AM2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:57+5:30
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाचे वतीने विविध उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. गत १५ दिवसापूर्वी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळली. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. सदर व्यक्तीच्या अतीजोखीम संपर्कातील सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. तर १५ दिवसानंतर सदर व्यक्तीचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने तुर्तास भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २०३ व्यक्तींना आणि संस्थात्मक अलगीकरण कक्षातून ३९७ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसून गत १५ दिवसापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधीत व्यक्तीचे दोनही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला असून नागपूर येथे पाठविलेल्या ६१७ पैकी ६०४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १२ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाचे वतीने विविध उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. गत १५ दिवसापूर्वी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळली. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. सदर व्यक्तीच्या अतीजोखीम संपर्कातील सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. तर १५ दिवसानंतर सदर व्यक्तीचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने तुर्तास भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १०व्यक्ती दाखल आहेत. तर आतापर्यंत तेथे उपचार घेऊन २०३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. मंगळवारी नर्सिंग वसतिगृहाच्या अलगीकरण कक्षात २१ व्यक्ती दाखल असून तुमसर, मोहाडी आणि साकोली येथील कोवीड केअर सेंटरमध्ये २२ व्यक्ती असे ४३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल आहेत. आतापर्यंत ३९७ व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली आहे.
सोमवारी ११ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी आले असून पूर्वीचा एक असे १२ अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत ६१७ नमुन्यांपैकी ६०४ नमुने निगटिव्ह आले आहेत. प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
तीव्र श्वासदाहचे ११८ व्यक्ती दाखल
जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्रात फ्ल्यू ओपीडी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत तीव्र श्वासदाहचे ११८ व्यक्ती दाखल करण्यात आले. त्यापैकी ११७ व्यक्तींच्या घशातील स्बॅबचे नमुने पाठविले असता ११५ नमुने निगटिव्ह आले आहेत. दोन अहवाल अप्राप्त आहेत. यासोबतच घरोघरी जाऊन आशा व अंगणवाडी सेविकामार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत आहेत.
१३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत १३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आली. सतत जनतेच्या संपर्कात येणाºया या सर्व अधिकाºयांची तपासणी करण्यात आली आहे.