पालिका प्रशासनाची माघार; गृहकर कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:32 PM2017-12-26T22:32:35+5:302017-12-26T22:33:27+5:30

वाढीव गृहकराच्या मुद्यावर संतापलेल्या भंडारेकरांसाठी थोडीफार गुडन्यूज आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेले गृहकर निश्चितपणे कमी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी दिली.

Hometax will be reduced | पालिका प्रशासनाची माघार; गृहकर कमी होणार

पालिका प्रशासनाची माघार; गृहकर कमी होणार

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षांची पत्रपरिषदेत माहिती : करदात्यांना पुन्हा पाठविणार डिमांड

आॅनलाईन लोकमत
भंडारा : वाढीव गृहकराच्या मुद्यावर संतापलेल्या भंडारेकरांसाठी थोडीफार गुडन्यूज आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेले गृहकर निश्चितपणे कमी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता पालिकेत आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
भंडारा नगरपालिका हद्दीत गृह व वाणिज्य इमारती मिळून एकुण २२ हजार ८०० करदाते आहेत. वर्षाकाठी पालिकेला कराच्या माध्यमातून ३ कोटी ३५ लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त होत असतो. सन २०१७-१८ हे वर्ष करनिर्धारण पुनर्रचनेचे असल्यामुळे करदात्यांच्या घरांचे सर्व्हेक्षण करून वाढीव गृहकराची डिमांड पाठविण्यात आली होती. यात अव्वाचे सव्वा गृहकराचे बिल प्राप्त झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. काँग्रेससह विविध पक्ष व संघटनांनी पालिकेवर हल्लाबोल करीत आंदोलनाचाही इशारा दिला होता. खुद्द पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनीही भरसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. परिणामी यावर नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांनी विशेष सभा बोलाविण्याचे आश्वासन दिले होते.
याबाबत मेंढे यांनी सांगितले की, २२ डिसेंबर रोजी पालिका सदस्यांची विशेष सभा घेऊन वाढीव गृहकराच्या बाबतीत नागरिकांमध्ये रोष असून त्यावर मार्ग काढण्यात आला. नागरिकांनी गृहकर कमी करण्यासाठी ३ हजार ७३३ अर्ज पालिकेत दाखल केले आहेत.
यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच शहराची पाच झोनमध्ये उभारणी करण्यात आली असून सर्वच करधारकांची सरसकट फक्त १५ ते २० टक्केच गृहकर वाढ करण्यात येईल असे स्पष्ट मत नगराध्यक्ष यांनी व्यक्त केले. भाड्याने राहत असलेल्या व्यक्तींना मात्र नियमाप्रमाणे गृहकर द्यावे लागणार आहे. वाणिज्य जागेच्या वापराबाबतही रहिवासी गृहकराच्या दीडपट दर आकारले जाणार आहे. नववर्षाच्या प्रारंभीच वाढीव कर बिलाचे डिमांड नागरिकांना देण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला नगरपरिषद उपाध्यक्ष रुबी चढ्ढा, नगरसेवक नितीन धकाते, कर अधिकारी नागेश कपाटे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
सैनिकांना ५० टक्के कर सवलत
नगरपालिका हद्दीत एखाद्या सैनिकाचे घर त्याच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे असल्यास गृहकरात ५० टक्के सवलत देण्यात येईल अशी माहितीही पत्रकार परिषदेत सुनिल मेंढे यांनी दिली. अशा बाबतीत सैनिकांना गृहकरात सुट देणारे भंडारा नगरपरिषद पहिली ठरणार असून याबाबतचा ठराव पालिकेच्या सभेत विचाराधीन असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Hometax will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.