दहा वर्षीय बालकाचा असाही प्रामाणिकपणा

By admin | Published: June 23, 2017 12:24 AM2017-06-23T00:24:56+5:302017-06-23T00:24:56+5:30

बँकेतून काढलेल्या ४० हजारातून १० हजार रूपयांच्या नोटांचे बंडल दुचाकीत ठेवताना अचानक खाली पडले,

The honesty of ten years old child | दहा वर्षीय बालकाचा असाही प्रामाणिकपणा

दहा वर्षीय बालकाचा असाही प्रामाणिकपणा

Next

प्रकरण मोहदुरा येथील : सापडलेले दहा हजार रूपये कले परत
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहदुरा : बँकेतून काढलेल्या ४० हजारातून १० हजार रूपयांच्या नोटांचे बंडल दुचाकीत ठेवताना अचानक खाली पडले, हे त्या रक्कम ठेवणाऱ्याच्या लक्षात आले नाही. तो इसम गाडी घेऊन निघून गेला पण तेवढ्यात एक १० वर्षीय मुलगा त्याच बँकेत काही कामासाठी जात असताना त्याला ते नोटांचे बंडल दिसले. त्याने बंडल उचलून सरळ हाताने बँकेतील अधिकाऱ्याकडे जाऊन परत केले. प्रामाणिकता दाखवून मिळालेले पैसे परत केल्याने त्या बालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
अमीत लिचडे असे या बालकाचे नाव आहे.
ही घटना आहे मोहदुरा येथील परमात्मा एक पत संस्थेमधील हत्तीडोई येथील खुशाल बांडेबुचे नामक व्यक्तीने पतसंस्थेतून ५० हजार रूपये कर्ज म्हणून काढले तेथून ४० हजार रूपये घेऊन ती रक्कम रूमालामध्ये गुंडाळून दुचाकीमध्ये ठेवत असताना अचानक १० हजार रूपयांचा नोटांचा एक बंडल खाली पडला.
हे खुशालच्या लक्षात आले नाही व तो तिथून गावात गेला पण तेवढ्यात वर्ग ५ वीमध्ये शिकत असलेला अमीत लिचडे हा पतसंस्थेत अभिकर्ता असलेल्या आपल्या वडिलाकडे भेटायला जात होता. याचदरम्यान ही घटना घडली. बँकेच्या समोर त्याला नोटांचा बंडल दिसले.
थोडावेळ इकडे तिकडे बघून त्याला कुणीच दिसले नाही व त्यांनी प्रामाणिकपणे बँकेत जाऊन मला हे पैसे बाहेर पडले दिसल्याचे बोलून ते त्यांनी तेथील बँक कर्मचाऱ्यांना परत केले व ते पैसे नंतर रक्कम काढणाऱ्या खुशाल बांडेबुचे याला परत केले. लहान मुलाने दाखविलेली प्रामाणिकता हे त्याचे मोठेपण असून समाजाने या लहान मुलाकडून प्रेरणा घ्यावी हे यावरून दिसून येते.

Web Title: The honesty of ten years old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.