महिलेची सोन्याची चेन परत करून दाखविला प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:25 PM2018-08-05T22:25:37+5:302018-08-05T22:26:05+5:30
होय, वरील शीर्षक वाचून दचकलात, वास्तव अशी घटना आहे. हातातली सोन्याची साखळी दाखवत, ताई ही साखळी तुमचीच आहे का? असे बोलून एका महिलेने ती साखळी ताईच्या हातात दिली. होय, आमचीच आहे, असे बोलून ताईचे हृदय भरून आले. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आजही प्रामाणिकपणा जपणारी माणसं जीवंत आहे. याचा प्रत्यय देणारी नवलाई तसेच आदर्श प्रेरणा देणारी माणसं मोहाडी येथे दिसून आली.
राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : होय, वरील शीर्षक वाचून दचकलात, वास्तव अशी घटना आहे. हातातली सोन्याची साखळी दाखवत, ताई ही साखळी तुमचीच आहे का? असे बोलून एका महिलेने ती साखळी ताईच्या हातात दिली. होय, आमचीच आहे, असे बोलून ताईचे हृदय भरून आले. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आजही प्रामाणिकपणा जपणारी माणसं जीवंत आहे. याचा प्रत्यय देणारी नवलाई तसेच आदर्श प्रेरणा देणारी माणसं मोहाडी येथे दिसून आली.
आजही समाजात प्रामाणिक माणसे कमी नाहीत. याची प्रचिती डॉक्टर प्रशांत थोटे यांच्या मातोश्री गीता थोटे यांनी करून दिली. काल रस्त्यावर पडलेली सोन्याची साखळी तिने स्वत:कडे न ठेवता साखळी असणाºया मालकापर्यंत पोहचविण्याचे कौतुकास्पद तेवढेच प्रेरणादाई कार्य त्यांनी केले. क्षणभर एखादी वस्तू नजरेआड झाली तर तिच्यावर नजर ठेवणाºया वृत्तीची माणसे पावलोपावली बघायला मिळतात. साधा पेन अगदी रुमालही अलगद उचलणारी व्यक्ती दिसतात. त्या महिलेने सोन्याला किंमत न देता घरी जावून सोनसाखळी परत केली. घटना अशी की, नित्याप्रमाणे माया दिपटे दूध घरी आणण्यासाठी मांडेसर रस्त्यावर असलेल्या शेतावर गेल्या होत्या. परत येत असताना गळ्यातील साखळी रस्त्यावर पडली. घरी आल्यानंतर साखळी पडल्याची जाणीव झाली. अंधारात साखळी शोधायला नरेश दिपटे व त्यांची पत्नी माया दिपटे मांडेसर मार्गे गेले. सोन्याची साखळी नजरेत आली नाही. सकाळ झाली. पुन्हा पत्नीसह दिपटे दांपत्य शेताच्या वाटेने गेले. त्यांना पुन्हा निराशाच हाती आली. प्रात:काली चौंडेश्वरी मार्गाने नत्थू पिकलमुंडे व त्यांच्या मागोमाग गीता थोटे व इतर महिला सोबत होत्या. चालत असताना नत्थू पिकलमुंडे यांना सोनसाखळी दिसली. त्यांनी गीता थोटे यांना उचलायला सांगितले. गीताताई ती सोनसाखळी घेवून घरी आल्या. काही वेळानंतर त्या नातवांना शाळेत सोडण्यासाठी बसस्टॉपवर आल्या. मागल्या पावली मायाताई दिपटेही मुलाला शाळेत सोडण्यासाठी तिथे आल्या. बसला अवधी असल्याने त्या एकमेकांशी संवाद साधत होत्या. गीतातार्इंनी, तुम्ही सकाळी चौंडेश्वरी मार्गाने काही शोधत होते काय? असे विचारले. रात्री सोन्याची साखळी रस्त्यावर पडली, पण शोधूनही सापडली नाही. माझ्याकडे तुमची सोनसाखळी आहे. असे न सांगता रहस्य कायम ठेवत गीता थोटे घरी गेल्या. लागलीच सोनसाखळी घेवून दिपटे यांच्या घराकडे गेल्या दारातून गीतानी मायाला हाक मारली. मायातार्इंच्या हातात सोनसाखळी ठेवली. एकीला कष्टाची, श्रमाची मौल्यवान वस्तू परत केली. त्याचा समाधान तर दुसरीला मौल्यवान वस्तू घरी परत आली. प्रामाणिकपणा हा दुर्मिळ गुण बघण्याचा आनंद दोघांनी हसून व्यक्त केला.